Thu, Apr 25, 2019 11:31होमपेज › Kolhapur › सराफाकडून 20 तोळे सोने, 11 किलो चांदी हस्तगत

सराफाकडून 20 तोळे सोने, 11 किलो चांदी हस्तगत

Published On: Jun 28 2018 1:37AM | Last Updated: Jun 28 2018 1:33AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सोनेतारण कर्जासाठी ठेवीदारांचे सोन्याचे दागिने बदलून ते वितळविल्याचे उघडकीस आले. सोनार सन्मुख ढेरे याच्या मध्यस्थीतून हे दागिने गुजरीतील अशोक माळी याला विकण्यात आले होते. माळीकडून 20 तोळे सोन्याची लगड व 11 किलो चांदी असा सुमारे दहा लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. 

केडीसीसी बँकेतील सोनेतारण प्रकरणातील 31 कर्जदारांचे सोने बनावट असल्याचे उघडकीस आले होते. शाखाधिकारी संभाजी शंकर पाटील (वय 56, रा. शिये, करवीर), परशुराम कल्लाप्पा नाईक (48, रा. बलभीम गल्ली, कसबा बावडा), सोनार सन्मुख आनंदराव ढेरे (45, रा. पिंजार गल्ली, कसबा बावडा) या तिघांनी संगनमताने कर्जदारांचे सोन्याचे दागिने परस्पर बदलून त्याजागी बेंटेक्सचे दागिने ठेवले. सन्मुख ढेरे याने हे दागिने वितळवून त्याची सोन्याची लगड बनविली. या लगडी त्याने गुजरीतील महालक्ष्मी बुलियनच्या अशोक माळी याला विकल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. माळी याने या सोन्याच्या विक्रीतून चांदीचे दागिने खरेदी करून स्वत:च्या दुकानात विक्रीसाठी ठेवले होते. पोलिसांनी त्याच्याकडून 20 तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 11 किलो चांदीचा ऐवज जप्त केला.