Fri, Jan 18, 2019 21:16होमपेज › Kolhapur › कर्नाटकात भाजप की काँग्रेस? कोल्हापूरकरांनी लावलीय ५१ हजारांची पैज

कर्नाटकात भाजप की काँग्रेस? कोल्हापूरकरांनी लावलीय ५१ हजारांची पैज

Published On: May 13 2018 2:50PM | Last Updated: May 13 2018 2:53PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी कालच (१२ मे) मतदान पार पडले आहे. आता राज्यातील सर्वांनाच निकालाची प्रतिक्षा आहे. पण, कोल्हापूरातील दोन राजकीय कार्यकर्त्यांना मात्र त्याची प्रचंड उत्सुकता आणि हुरहुर लागून राहीली आहे. कारण, जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील राजू मगदूम आणि नेमिनाथ मगदूम यांनी कर्नाटकात कोणाचा विजय होईल यावर तब्बल ५१ हजारांची पैज लावली आहे. 

कर्नाटकात चुरशीने मतदान पार पडल्यानंतर अनेकांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून मतदारांचा कल कोणाकडे असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकात विजयी होणे जितके काँग्रेस आणि भाजपसाठी महत्त्वाचे आहे. त्याहीपेक्षा जास्त ते कोल्हापूरच्या या दोन कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचे ठरले आहे. राजू हे काँग्रेसचे तर नेमिनाथ हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत.  विशेष म्हणजे ही पैज लेखी स्वरूपात ७ साक्षीदारांसमोर लावण्यात आली आहे. या पैजेत जो कोणी जिंकेल त्याने माणगाव येथील वैष्णवी देवी मंदिराचे नूतनीकरणासाठी करायचे असेही या लेखी पैजेत म्हटले आहे. 

कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आली तर नेमिनाथ यांनी राजू यांना रोख ५१ हजार द्यायचे. जर भाजपची सत्ता आली तर राजू यांनी नेमिनाथ यांना ५१ हजार रोख द्यायचे असे ठरले आहे.