Tue, Nov 20, 2018 13:10होमपेज › Kolhapur › सम्राटनगरात अर्ध्या तासात 2 चेन स्नॅचिंग

सम्राटनगरात अर्ध्या तासात 2 चेन स्नॅचिंग

Published On: Sep 05 2018 2:13AM | Last Updated: Sep 05 2018 2:13AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

सम्राटनगरात दोन महिलांच्या गळ्यातील दागिने अज्ञात मोटारसायकलस्वारांनी हिसडा मारून पळविले. मंगळवारी सायंंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान या लागोपाठ घटना घडल्या. जबरी चोरीच्या घटनांनी परिसरातील महिलांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. 

विद्या माधवराव पाटील (वय 70, रा. सम्राटनगर) या साडेसहाच्या सुमारास सम्राटनगर चौकात आल्या असता, पाठीमागून आलेल्या दोघांनी गळ्यातील 3 तोळ्यांची सोनसाखळी हिसडा मारून काढून घेतली. दोघे भरधाव वेगात प्रतिभानगरच्या दिशेने निघून गेले. तर सातच्या सुमारास स्नेहल श्रीकांत धुमे (61, रा. नलवडे कॉलनी) या एनसीसी भवनकडून पायी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गळ्यातील साडेचार तोळ्यांचे गंठण पळवले. चालकाने डोक्यावर हेल्मेट घातले होते. तर मागे बसलेल्या संशयिताने रेनकोट घातल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. 

राजारामपुरी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेतले. रात्री उशिरा दोन्ही घटनांची नोंद पोलिसांत झाली.