Tue, Jun 18, 2019 20:55होमपेज › Kolhapur › १८ वर्षे पूर्ण; युवक-युवतींचा सत्कार : निवडणूक आयोग

१८ वर्षे पूर्ण; युवक-युवतींचा सत्कार : निवडणूक आयोग

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 24 2017 12:38AM

बुकमार्क करा

राधानगरी : वार्ताहर

सन 2000 मध्ये जन्माला आलेल्या युवक-युवतीला 18 वर्षे 1 जानेवारी 2018 ला पूर्ण झालेल्या युवक-युवतींचा विशेष सन्मान करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

सध्या सर्वत्र मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम निवडणूक आयोगाने आखला असून मतदारांनी नोंदणी करणे, नावे वगळणे अशी प्रक्रिया सुरू आहे. 21 व्या शतकाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2000 रोजी जन्मलेल्या युवक-युवती 2018 सालच्या पहिल्या दिवशी वयाची 18 वर्षे पूर्ण करून 19 व्या वर्षांत पदार्पण करणार आहेत. अशा युवक-युवतींचा शोध घेऊन त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ठ करण्यासाठी प्रोत्साहनपर मोहीम राबविण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहेे. 

जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी त्यांच्या स्तरावर संकेतस्थळ, सोशल मीडियातून एक हजार मतदारांना नावनोंदणीसाठी आमंत्रित करावे. ग्रामपंचायत, दवाखाने, जन्म-मृत्यूच्या यादीतून एक हजार मतदारांचा शोध  सुरू आहे. अशा मतदारांच्या घरी जाऊन बी. एल. ओ. नी. त्यांचा सत्कार करावा. तसेच आगामी राष्ट्रीय मतदार दिवस 2018 रोजी तरुण मतदारांच्या समवेत त्यांना मी हिंदुस्थानचा सहस्त्रक मतदार आहे. असे लिहलेला खास बॅच देऊन सत्कार करण्यात यावा. अशा मतदारांनी त्यांची छायाचित्र व मतदान ओळखपत्र, त्यांचा फेसबुक पेजवर टाकावे व संबंधितांना टॅग करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावे. असा मतदारांना वैयक्‍तिकपणे जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी प्रमाणपत्र द्यावे, अशा सूचना ही निवडणूक आयोगाने दिल्या असल्याचे समजते.