Wed, Jan 22, 2020 14:26होमपेज › Kolhapur › म्हाकवेतील सहलीचे १५० विद्यार्थी आळंदीत अडकले

म्हाकवेतील सहलीचे १५० विद्यार्थी आळंदीत अडकले

Published On: Jan 04 2018 1:20AM | Last Updated: Jan 04 2018 12:34AM

बुकमार्क करा
म्हाकवे : वार्ताहर 

येथील प्राथमिक शाळेतील 150 विद्यार्थी जेजुरी, देहू, आळंदी या मार्गावर सहलीसाठी गेले होते. बुधवारी  दिवसभर सर्वत्र भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारल्याने एसटी महामंडळाने  सर्व बसेस एसटी आगारात लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या मुलांच्या तीनही बसेस शेजारच्या तळेगाव आगारात जमा करण्यात आल्या. परिणामी, ही सर्व मुले व सोबतचे शिक्षक आळंदी येथेच अडकून पडले. त्यामुळे सर्व पालकवर्ग चिंताक्रांत बनले आहेत. 

म्हाकवे येथील 150 मुलांची सहल घेऊन कागल आगाराच्या तीन बस मंगळवारी पहाटे 5 ला देहू, आळंदी, जेजुरी येथे गेल्या होत्या. बुधवारी सकाळी या बस पुण्यात आल्यानंतर महाराष्ट्र बंदमुळे परिवहन विभागाने सर्व बस आगारात जमा केल्या. सध्या पुण्यात वास्तव्यास असणार्‍या युवराज हळदकर यांनी भेट घेऊन या मुलांना सकाळी चहापानाची व्यवस्था केली. तर, सायंकाळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माउलींच्या समाधीस्थळावर आयोजित महाप्रसाद घेऊन सर्व मुले सहल अर्ध्यावरच सोडून रात्री उशिरा घरी परतली. सर्व पालक आज दिवसभर फोनवरून आपल्या मुलांची विचारपूस करत होते. तर सोशल मीडियावरून मुले सुरक्षित ठिकाणी असल्याचे संदेश दिले जात होते.