Thu, Jul 18, 2019 20:54होमपेज › Kolhapur › सावकार मादनाईकांसह १५ आंदोलकांविरुद्ध गुन्हा

सावकार मादनाईकांसह १५ आंदोलकांविरुद्ध गुन्हा

Published On: Jul 19 2018 1:37AM | Last Updated: Jul 19 2018 1:12AMजयसिंगपूर : प्रतिनिधी

तमदलगे खिंडीत मंगळवारी रात्री उशिरा दूध टँकर पेटवल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सावकार मादनाईक यांच्यासह 15 जणांविरोधात बुधवारी गुन्हा नोंद करण्यात आला. आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद टेम्पोचालकाने पोलिसांत दिली आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाला मंगळवारी रात्री हिंसक वळण लागले. जयसिंगपूर रेल्वे स्टेशन ते दानोळी फाटा मार्गावर गोकुळ दूध संघाचा टँकर, तर तमदलगे खिंडीत अज्ञातांनी टेम्पो पेटविला. दरम्यान, बुधवारी दिवसभर शांततेत आंदोलन झाले. तालुक्यातील दूध संकलन ठप्प आहे. गोकुळ सॅटेलाईट डेअरीतही संकलन झाले नाही.

बायपास रोडवर पेटविलेल्या टँकरप्रकरणी सावकर मादनाईक यांच्यासह 15 जणांवर, तसेच एकूण 20 ते 25 अज्ञातांवर चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

यामध्ये ‘स्वाभिमानी’चे जिल्हा युवा अध्यक्ष सागर संभुशेटे, महावीर पाटील, अमित सांगले, कुबेर मादनाईक, संदीप कामन्‍ना, संदीप बेडगे, सागर चिपरगे, अनिल कामन्‍ना, नेमिनाथ मादनाईक, अभय पाटील-धडेल, अमित देसाई, आशिष समगे, सचिन भोसले, निखिल इंगळे यांचा संशयितात समावेश आहे. 

चालक सुनील हिंदुराव डावरे (वय 29, रा. जेऊर, ता. पन्हाळा) यांनी जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. दुधाचा रिकामा टँकर (एम.एच. 09 सीयू 7011) गोकुळ शिरगाव दूध डेअरीतून सलगरे (ता. मिरज) येथे दूध भरण्यासाठी जात असताना दानोळी फाट्याजवळ रात्री साडेदहाच्या सुमारास सुमारे 40 जणांच्या जमावाने टँकर अडवून तो पेटविला.टेम्पोही पेटवलाटँकर पेटल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तमदलगे खिंडीत टाटा टेम्पोही पेटविण्यात आला. कोल्हापूरच्या दिशेने जाणारा हा टेम्पो दूध गोळा करण्यासाठी जात होता, असे समजते.