Sun, Feb 23, 2020 15:43होमपेज › Kolhapur › सोनाळीतील सराफाची 15 लाखांची फसवणूक

सोनाळीतील सराफाची 15 लाखांची फसवणूक

Published On: Aug 25 2019 1:43AM | Last Updated: Aug 25 2019 1:43AM
मुरगूड : प्रतिनिधी

कागल तालुक्यातील सोनाळी येथील सराफाकडून 48 तोळे सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली आणि त्यांना 15 लाख 277 रुपयांचा धनादेश दिला. धनादेश न वटल्याने आपली फसवणूक झाल्याची फिर्याद सराफ रमेश बाळकृष्ण पोतदार (वय 49) यांनी मुरगूड पोलिसांत दिली.

याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश ईश्‍वरा पाटील, सचिन बाळासोा पाटील (रा. कोल्हापूर) व त्यांचे नातेवाईक बाळासोा विठ्ठल सापळे, सुरेश बाळासोा सापळे अशी त्यांची नावे आहेत.
सुरेश पाटील व सचिन पाटील यांनी सराफ रमेश पोतदार यांच्याकडून 488 ग्रॅम (48.8 तोळे) वजनाचे सोन्याचे दागिने 15 लाख 277 रुपयांना 16 ऑगस्ट रोजी खरेदी केले. खरेदी रकमेचा धनादेश त्यांनी पोतदार यांना दिला. खात्यावर रक्‍कमच नसल्याने पोतदार यांना पैसे मिळू शकले नाहीत. त्यांनी पाटील व सापळे यांच्याकडे चौकशी केली असता, काही दिवसात पैसे मिळतील, असे दोघांनी सांगितले. बाळासोा सापळे व सुरेश सापळे यांनी याप्रकरणी मध्यस्थी करून नोटरी करून दिली. नोटरीची मुदत संपताच विचारणा करण्यास गेल्यानंतर सापळे बंधूंकडून आपणास धमकावण्यात आल्याचे पोतदार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक भगवानराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार महेश माळवदे करीत आहेत.