Tue, May 30, 2017 04:07
29°C
  Breaking News  


होमपेज › Kolhapur › उपचारादरम्यान झाला मृत्यू

इचलकरंजी:चौथ्‍या मजल्‍यावरुन पडून मुलाचा मृत्‍यू

By pudhari | Publish Date: May 19 2017 6:24PM

एका खासगी शाळेत नववीच्या वर्गात घेत होता शिक्षण 


इचलकरंजी : प्रतिनिधी 

चौथ्या मजल्यावरून पडल्यामुळे जखमी झालेल्या अभय उदय वाळवेकर (वय १४, रा. खंजिरे मळा) हा शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. 

उदय वाळवेकर यांचा तंबाखूचा व्यापार असून ते मोबाईलचे शहरातील मोठे वितरक आहेत. त्यांना अभय व एक मुलगी असून खंजिरे मळा येथे त्यांचा मोठा बंगला आहे. तळघरात गोडावून तर दुसर्‍या मजल्यावर ते राहण्यास आहेत. तिसर्‍या मजल्यावर अभयची स्वतंत्र खोली आहे. गुरूवारी सकाळी ९ च्या सुमारास अभय चौथ्या मजल्यावर गेला होता. त्यावेळी तिसर्‍या मजल्यावर त्याची स्वतंत्र खोली असल्यामुळे तो अभ्यास करीत असेल किंवा चौथ्या मजल्यावर तो कुत्र्याबरोबर खेळत असेल असा घरच्यांचा समज झाला. मात्र, उशिरापर्यंत तो खाली न आल्यामुळे वडिल उदय यांनी अभयला हाक दिली. मात्र, कोणताच प्रतिसाद न आल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी तो खाली पडल्याचे निदर्शनास आले. जखमी अवस्थेत त्याला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अभयच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाली होती. सकाळपासून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र, रक्तदाब कमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. 

ताो एका खासगी शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या पश्‍चात बहिण, आई-वडिल असा परिवार आहे. अभय वाळवेकर त्यांच्या मुलाच्या निधनाचे वृत्त समजताच घरासमोर गर्दी केली होती. सोलर पुसत असताना किंवा खेळत असताना तोल जाऊम तो पडला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.