Sat, Dec 15, 2018 19:02होमपेज › Kolhapur › कळंबा कारागृहात मोठी कारवाई; १४ पोलिस अधिकारी निलंबित  

कळंबा कारागृहात मोठी कारवाई; १४ पोलिस अधिकारी निलंबित  

Published On: Dec 07 2018 10:14PM | Last Updated: Dec 07 2018 10:17PM
 कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

मोबाईल तसेच पिस्तूल प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कळंबा कारागृहामधील १४ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी ही धडक कारवाई केली. 
 

वाई हत्याकांडातील संशयित आरोपी डॉक्टर संतोष पोळ कळंबा कारागृहात पिस्तूल घेऊन फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारागृहाची पाहणी करत चौकशी केली. यामध्ये त्याच्याजवळील पिस्तूल नकली असल्याचे तपासात पुढे आले परंतु त्याला कारागृहात मोबाईल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी सांगितले होते. 

रिव्हॉल्व्हर खरे की खोटे, हा प्रश्‍न निर्माण झाला असला, तरी संपूर्ण चित्रफीत कारागृहातील असल्याचे शेळके यांनी मान्य केले आहे. विशेषकरून त्यासाठी मोबाईलचा वापर झाल्याचेही स्पष्ट झाले. कारागृहाच्या कडेकोट सुरक्षिततेचा दावा करण्यात येत असताना संतोष पोळकडे मोबाईल आला कोठून? हा कळीचा मुद्दा चर्चेत आला आहे.