Sat, Jul 20, 2019 08:51होमपेज › Kolhapur › एसटी ओढ्यात कोसळून १३ प्रवासी जखमी 

एसटी ओढ्यात कोसळून १३ प्रवासी जखमी 

Published On: May 22 2018 1:25AM | Last Updated: May 22 2018 12:39AMदेवाळे : वार्ताहर

बार्शीहून मालवणला जाणारी एसटी कांडगाव (ता. करवीर) येथे शेरीच्या ओढ्यात कोसळून 13 प्रवासी जखमी झाले. सोमवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. स्टेरिंग रॉड तुटल्यामुळे हा अपघात घडला. चालक कृष्णा गुंडू मोरे  किरकोळ जखमी झाले आहेत. जखमीमध्ये चार वर्षांच्या मनस्वी व 1 वर्षाच्या प्राची या मुलीचा समावेश आहे. अपघातात एसटीच्या दर्शनी भागाचा  चक्काचुरा झाला आहे.

जखमींची नावे : अरुण संभाजी शिंदे (वय 52, रा. कोंडवे, जि. सातारा), बाळू  तातोबा पोवार (65), गोजाबाई बाळू पोवार ( 55,  रा. दरवेश पाडळी), विमल श्रीमंत लोकरे (54, बार्शी), शांता दिलीप जगदणे (46, रा. मुंबई), मनस्वी महेंद्र लोकरे (4,  रा. बार्शी), सुप्रिया अशोक मुसळे ( वय 48), अशोक लहू मुसळे (वय 55, रा सुकऴवाड, जि.सिंधुदुर्ग) रमेश सिताराम नारकर (68 रा. फोंडा), अमित आनंद सावंत (39, मालवण), सविता संतोष कोकणे (25, डिगज ता. राधानगरी), प्राची संतोष कोकणे (1 वर्ष,  राधानगरी) व दिलीप राजाराम वेलणकर (56, रा. राजापूर).

बार्शी आगाराची एसटी (एम. एच.14 बी 7 - 2677)  बार्शी येथून सकाळी साडेसहा वाजता मालवणला जाण्यासाठी सुटली. एसटी कोल्हापूर सीबीएस स्टँड, रंकाळा बस स्टँड येतील प्रवासी घेऊन शहरातून बाहेर मालवणच्या दिशेने निघाली.  दुपारी पावणे तीनच्या सुमारास कांडगाव हायस्कूलसमोर स्टेरिंग रॉड तुटला. त्यामुळे  चालकाचा एसटीवरील ताबा सुटून एसटी रस्त्याच्या डाव्याबाजूकडील ओढ्यात उलटली. या एसटीतून एकूण 42 प्रवासी प्रवास करत होते. जखमींना सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत अन्य 8 प्रवासीही होते.