Tue, Apr 23, 2019 14:20होमपेज › Kolhapur › होळीनिमित्त सोनाळी येथील महिलांकडून १२०० पोळ्यांचे दान

होळीनिमित्त सोनाळी येथील महिलांकडून १२०० पोळ्यांचे दान

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 04 2018 10:24PMसावर्डे बुद्रुक : वार्ताहर

होळी सणात नैवेद्य म्हणून पोळी अर्पण करण्यापेक्षा ती गरजूंना दिली पाहिजे, या भावनेतून सोनाळी (ता.कागल) येथील  महिलांनी सामाजिक बांधिलकीतून ‘होळी लहान पोळी दान’ हा उपक्रम राबवला व कोल्हापूर शहरात भवानी मंडप, रेल्वे स्टेशन, बसस्थानक व महालक्ष्मी मंदिर परिसरातील गरजूंना 1200 पोळ्या दान केल्या.

सणापासून दुरावलेल्या वंचितांना सणाचा उपभोग घेता यावा व भुकेलेल्यांना मदत करण्यासाठी येथील महिलांनी गावामध्ये पोळी दान करण्याचे आवाहन केले होते. त्याला गावकर्‍यांनी प्रतिसाद देत बाराशे पुरणपोळ्या जमा केल्या व 40 कि.मी.वर जाऊन कोल्हापूर शहरात वितरित केल्या. सणाच्या  आनंदापासून दुरावलेल्यांना गरजूंनी या पुरणपोळ्यांच्या आस्वाद घेतला. त्यांच्या चेहर्‍यावर एक समाधान दिसत होते.

तसेच मंदिर परिसरात काही भाविकांनीदेखील गावाकडील चुलीवरील या पुरणपोळ्यांचा प्रसाद म्हणून स्वीकार करत आस्वाद घेतला.  या उपक्रमात गीता  हासूरकर, प्राजक्ता म्हातुगडे, रूपाली शेणवी, जयश्री बचाटे, प्रमिला पोवार, डॉ. श्रद्धा पाटील, ललिता पाटील, संपदा पोवार तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.