विसर्जनावेळी राज्यात १२ जण बुडाले; मुंबईत ४१ जखमी

Published On: Sep 12 2019 11:55PM | Last Updated: Sep 13 2019 12:12AM
Responsive image


पुढारी : ऑनलाईन
राज्यभरात मोठ्या उत्साहात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका काढल्या जात आहेत. तब्बल १२ दिवस आपल्याकडे विराजमान झालेल्या श्री गणरायाला महाराष्ट्रातील जनता मोठ्या मनोभावे निरोप देत आहे. हा निरोप देतानाच श्रींचे विसर्जन करीत असतानाच राज्यात विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेत तब्बत १२ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अमरावती येथे ४, रत्नागिरी येथे ३, सिंधुदुर्ग येथे २, अहमदनगर येथे २ तर नाशिक येथे १ जण बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिवाय मुंबईतील गिरगाव येथे वेगवेगळ्या ठिकाणी ४१ जण जखमी झाले आहेत. उत्साहात चाललेल्या विसर्जन कार्यास अशा प्रकारे गालबोट लागल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील वाठोडा शुकलेश्वर येथे आज दुपारी विसर्जन करीत असताना चार जणांचा बुडून मृत्यू झाला. पूर्णा नदीपात्रात गणेश विसर्जन करताना एक तरुण बुडू लागला. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी तीन तरुणांनी नदीत उड्या मारल्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे तीन तरुणही बुडाले. सतीश जाबराव सोळंके, ऋषीकेश बाबुराव वानखेडे, सतीश बारीकराव वानखेडे आणि सागर अरुण शेंदूरकर अशी नदीत बुडालेल्या चौघांची नावे आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत असून हे चौघेही गौरखेडा येथील रहिवासी आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथेही गणपती विसर्जन करताना तीनजण बुडाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. कुलदीप वारंग, रोहीत भोसले आणि सिद्धेश तरवणकर अशी या तरुणांची नावे असून यापैकी कुलदीप आणि रोहीत हे दोघेही मुंबईचे राहणारे आहेत. आज दुपारी ही घटना घडली.

सिंधुदुर्गातही विसर्जनावेळी दोन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. गणपती विसर्जनाच्यावेळी आचरा समुद्र किनारी गणपती विसर्जनासाठी गेलेले आचरा वरची वाडी येथील दोन युवक बुडल्याची दुर्घटना आज सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. लाईफटाईम हॉस्पिटलचे कर्मचारी प्रशांत तावडे (२७) आणि एसटी महामंडळाचे ड्रायव्हर संजय परब (४७) हे घरच्या गणपतींचं विसर्जन करण्यासाठी समुद्रात घेऊन गेले होते. गणपती पाण्यात सोडून परतत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले.

नगरमध्ये विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. श्रीरामपूर येथील प्रवरा नदीत आणि शेवगावमधील ढोरा नदीत बुडून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

नाशिक मधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने येथे गणेश विसर्जनासाठी नाशिकहून आलेल्या युवराज राठोड (वय २८, दत्त नगर अंबड, नाशिक) या युवकाचा बुडून मृत्यू झाला. नाशिक येथील हा युवक आपल्या मित्रांसोबत गणपती विसर्जन करण्यासाठी आला होता. परंतु, गणपती बुडवत असताना  पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. 

राज्यातील या दुर्देवी घटनांसह शेजारील कर्नाटक राज्यात सुद्धा विसर्जनावेळी दोन तरुणांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बेटगेरी येथे विसर्जन करायला गेलेल्या दोन युकांचा बुडून मृत्यू झाला आहे. ओंकार रामलिंग सुतार (वय २२ वर्षे) आणि सागर बबन गुरव (वय१७, दोघेही राहणार बेटगेरी) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.
दरम्यान, मुंबई येथील गिरगावमध्ये विसर्जनादरम्यान वेगवेगळ्या घटनांमध्ये ४१ जण किरकोळ जखमी झाले असून एकजण फ्रॅक्चर झाला आहे.'चांद्रयान २' सॉफ्ट लँडिंगचा पीएम नरेंद्र मोदींकडून उल्लेख


भारतातील एक टक्के श्रीमंताकडे ७० टक्के लोकांपेक्षा जास्त संपत्ती 


विद्यार्थ्यांनी झुंजार वृत्तीच्या अनिल कुंबळेचा आदर्श घ्यावा : पंतप्रधान मोदी


औरंगाबाद जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे आंदोलन 


नागराज मंजुळेच्या 'झुंड'ची झलक पाहाच 


'विद्यार्थ्यांवर पालक व शिक्षकांनी दबाव टाकू नये'


इचलकरंजी प्रेस क्लब आणि डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन कार्यशाळा संपन्न


'चव्हाणांच्या गौप्यस्फोटामुळे शिवसेनेचा खरा चेहरा उघड'


CAA विरोधात २४ जानेवारीला राज्यव्यापी बंद


तंत्रज्ञानाचे भय बाळगू नका, त्याचे गुलामही बनू नका; पीएम मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र