Tue, Jul 16, 2019 09:40होमपेज › Kolhapur › सांग सांग भोलानाथ... आरक्षण मिळेल का?

सांग सांग भोलानाथ... आरक्षण मिळेल का?

Published On: Aug 05 2018 1:29AM | Last Updated: Aug 04 2018 11:44PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

बळीराजाच्या संस्कृतीत सुगीच्या दिवसांत दारावर येणार्‍या नंदीवाल्यांना भविष्याबद्दल विचारले जाते. चांगले उत्पन्न देणार्‍या शेतीस अनुकूल वातावरण असेल का?, पाऊसपाणी चांगले होईल का?, असे अनेक प्रश्‍न-शंका विचारून तात्पुरते का होईना मनाचे समाधान केले जाते. मात्र, कालओघात हाच बळीराजा अनेक अडचणींनी ग्रासला आहे. त्याला जगणे मुश्कील झाले आहे. आपल्या भावी पिढीच्या अस्तित्वाबद्दल तो चिंताग्रस्त आहे. या सर्वांतून तारण्यासाठी त्याला आरक्षणाची नितांत गरज आहे. या भावनेतून सकल मराठा आंदोलकांनी ‘सांग सांग भोलानाथ... आरक्षण मिळेल का?’ असा सवाल करून सर्वांनाच विचार करायला भाग पाडले. 

ऐतिहासिक दसरा चौकात सकल मराठा आरक्षण क्रांती ठिय्या आंदोलनाच्या 11 व्या दिवशीही पाठिंबा सत्र अखंड सुरू होते. शनिवारी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नंदीवालेही पोहोचले. आपल्या नंदी बैलासह त्यांनी दसरा चौकात हजेरी लावली. 

विविध प्रकारच्या आभूषणांनी सजवलेल्या नंदी बैलाला पारंपरिक वाद्यांच्या गजराच्या तालात विविध प्रश्‍न विचारण्यात आले. त्याला होकारार्थी आणि नकारार्थी मान हलवत होय-नाही, अशी उत्तरे नंदी बैलाने दिली. ‘आला... आला नंदी बैल आला....सत्तेतील मंत्र्यांना आता तरी जाग येणार काय?, मराठ्यांना आरक्षण मिळणार काय?, मराठा समाजाचे दुखणे लोकप्रतिनिधींना कळणार का?, सरकार आंदोलन फोडत आहे काय? मागासवर्गीय आयोग खरंच काम करतोय काय?, मराठा समाजातील आत्महत्यांना सरकार जबाबदार आहे का?, असे विविध प्रश्‍न यावेळी आंदोलकांनी केले. 

आयुष्याच्या चित्रपटाला वन्समोर नाही...

आंदोलनाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. शनिवारी एम.एस.ई.बी.मधून निवृत्त झालेले अभियंते आर. व्ही. पाटील यांनी ठिय्या आंदोलन करून आपल्या भावना काव्य पंक्तींतून व्यक्त केल्या.
 ‘आयुष्याच्या  चित्रपटाला ‘वन्समोर’ नाही... हव्या-हव्याशा वाटणार्‍या क्षणाला ‘डाऊनलोड’ करता येत नाही...नको-नकोशा वाटणार्‍या क्षणांना ‘डिलीट’ ही करता येत नाही...कारण हा रोजचा तोच-तो असणारा ‘रिअ‍ॅलिटी’ शो नाही...म्हणून भरभरून पूर्णपणे जगा... कारण हा चित्रपट पुन्हा लागणार नाही...’ असे म्हणत मराठा समाजातील युवकांनी आत्महत्या करून आपले अनमोल जीवन संपवू नयेे असे आवाहन केले. 

तुम्ही फक्त हाक द्या...आम्ही धावून येतो...
जिल्ह्यात गेली दिवस अकरा दिवस मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज बांधव ठिय्या मांडून आहेत.गावा-गावातही बंद ठेवून सरकार निषेध नोंदवला जात आहे.जिल्ह्याच्या विविध स्तरातून आंदोलनास वाढता पाठिंबा मिळत असून जोपर्यंत आरक्षणाची ठोस अमलबजावणी होत नाही.तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवा. तुम्ही फक्त हाक मारा... आम्ही धावून येतो,अशी साद पाठिंब्यासाठी येणारी तरूण मंडळे, तालीम संस्था, व्यायम मडळे, विविध संघटना, जाती-धर्माचे लोक देत आहेत.मराठा आरक्षणाची धग कायम ठेवण्याचा निर्धारही यावेळी बोलून दाखविला जात आहे.

हुपरी (ता.हातकणंगले) समस्त सकल मराठा बाधंव : महावीर गाट, विनायक विभुते, नेताजी निकम, मोहन वाईगडे, शिवाजी शिंदे, संग्राम वाईंगडे, अमित नरके, सुरज कदम, केदार मांवलेकर, विठ्ठल पाटील, गणेश कणसे, संदीप भंडारे, प्रशांत सुतार, अमित नरके, सुर्यकांत रावण, सचिन पोवार, विशाल चव्हाण, संदीप सिध्दनेर्ले, दत्तात्रय सुर्यवंशी, राहूल कामते, सौरभ कदम, उमाजी लाड, सुरज कदम, वैभव नवहारे, चिनू निंबाळकर, मोहन वाईंगडे, सौरभ घाडगे, सनम सावंत, नेजाती निकम, अमित चिंदगे, सागर चौगुले, सागर चौगुले, शुभम कदम, रोहित नाकील, विनायक नाकील, धैर्यशील हजारे, प्रसाद पोवार, नागेश पोवार, केदार मालेकर, शुभम धायगुडे, विनायक विभुते, मोहन वाईंगडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

 मराठा आरक्षणासाठी ब्राह्मण युवा मंचतर्फे आज रॅली

मराठा आरक्षणाल लढ्याला  पाठींबा देण्यासाठी ब्राह्मण युवा मंचतर्फे आज (दि. 5) मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9.30 वाजता निवृत्ती चौक येथून रॅलीला प्रारंभ होईल. गांधी मैदान, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंधीर, महाव्दार रोड, पापाची तिकटी, मनपा चौक, सीपीआर चौक, दसरा चौक असा रॅलीचा मार्ग असणार आहे. अशी माहिती ब्राह्मण युवा मंचचे संयोजन समिती सदस्य केदार वाघापूरकर, सुजय कुलकर्णी, लक्ष्मीसेन जोशी  यांनी दीली आहे.

माजगाव (ता.पन्हाळा) समस्त सकल मराठा बांधव : सरंपच शिवाजी पाटील, जीवन पाटील, अनिल चौगुले, हरीषचंद्र तडाखे, जीवन पाटील, अनिल चौगले, सुनिल कांबळे, अजय कुंभार, प्रदिप चौगले, निरंजन खोत, दगडू खोत, संजय गुरव, राज पाटील, सुनिल महाजन, विशाल जाधव, राज गुरव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

शारीरिक शिक्षण शिक्षक संघ : या संघाने पाठिंबा दिला.यावेळी आर.डी.पाटील, एस.व्ही.सुर्यवंशी, आर.बी.बुवा, संदीप पाटील, प्रदीप साळोखे, महेश सुर्यवंशी, अमित शिंत्रे, सयाजी पाटील, संजय पात्रे, संजय मोरे उपस्थित होते.यांनी पाठिब्याचे पत्र संयोजकांकडे दिले. 

कोल्हापूर सिव्हील इंजिनिअर व कॉन्ट्रॉक्टर असोसिएशन : मराठा आरक्षणास पाठिंबा देऊन ठिय्या मांडला.सुजित पाटील, विजय पाटील, मोहन गोखले, जितेंद्र लोहार, एम.जी.कुंभार, संजय मांगलेकर, सुनिल पवार, चंद्रकांत खाडेकर, राजू लाड उपस्थित होते. 

शेंडूर (ता.कागल ) सकल मराठा समाज बांधव : ग्रामस्थांच्या वतीने श्री अंबाबाई देवीस अभिषेक घालण्यात आला.शेंडूर ते दसरा चौक कोल्हापूर पर्यंत ग्रामस्थ चालत आले होते. यामध्ये शिवाजी कासोटे, बाबूराव शेवाळे, शशिकांत शेवाळे, निखील निबाळकर, बाळासो डोंगळे, गणपती मोरे, भानूदास मेडे, चंद्रकांत शेवाळे, अतुल पाटील, तानाजी माने, विनायक खिरूगडे, धनाजी पोवार, खंडू चव्हाण यांच्यासह तरूण मंडळांचे,विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

क्रांतीसिंह नाना पाटील रिंगरोड परिसर : येथील ज्येष्ठ नागरीकांनी मराठा आरक्षणास पाठिंबा देण्यात आले. वसंतराव देसाई, बी.डी.निकम, बी.सी.दळवी, ए.बी.खोपडे, डी.एस.कांबळे, रंगराव पाटील, बी.के.पाटील, एन.डी.रामाणे, अशोक माने, बी.जी.भोगम, पी.एस.लाड उपस्थित होते. 

माजी खासदार एस.के.डिगे मेमोरियल फाऊंडेशन : मराठा आरक्षणास फाऊडेशनने पाठिंबा दिला. भारत कुडित्रेकर, प्रभाकर कांबळे, अशोक भास्कर,धोंडीराम कांबळे, प्रा.डॉ.अतुल कांबळे, सतीश कुरणे, योगेश डिगे, राजू नाईक, कैलास शिंगे, महादेव कांबळे, योगेश माजगांवकर आदी उपस्थित होते. 

 दि.कोल्हापूर ग्रेन कॅन्वासिंग एंजंट असोसिएशन: यांनी मराठा आरक्षणास पाठिंबा दिला.यावेळी अध्यक्ष अरविंद जैन, उपाध्यक्ष संभाजी पाटील, निळकंठ सांगवडेकर आदी उपस्थित होते.
श्री रावणेश्‍वर महादेव भक्त मंडळ : भक्त मंडळाने मराठा आरक्षणास पाठिंबा दिला.यावेळी अध्यक्ष शशिकांत मुचंडी, उपाध्यक्ष श्रीजीत मुचंडी, सुनिल माळी, जयवंत पाटील, प्रकाश पोवार, प्रसन्न मालेकर, सचिन पाटील, छाया जाधव, प्रिया माळी, वर्षा पाटील, सुप्रिया माळी, गिता मस्कर आदी उपस्थित होते.

दसरा चौकातील ठिय्या आंदोलनात माजगाव (ता.पन्हाळा ) येथील आबालवृध्द सहभागी झाले होते.यामध्ये राष्ट्रपुरूषांच्या वेशभूषेत अथर्व चौगले (शिवाजी महाराज), चेतन विचारे (राजर्षी शाहू महाराज), करण दिंडे (महात्मा जोतिराव फुले), आशितोष चौगले (संत ज्ञानेश्‍वर) अणि आयुष कदम (अण्णाभाऊ साठे ) यांच्या वेशभूतद्वारे ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते.

1. हुपरी (ता.हातकणंगले) समस्त समाज बांधवांनी मराठा आरक्षणाल पाठिंबा दिला.ऐतिहासिक दसरा चौकात येऊन ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदवला.हुपरी नगरपालिकेचा मराठा आरक्षणला पाठिंब्याचा ठराव हुपरीच्या नगराध्यक्षा सौ.जयश्री गाट यांचे पती महावीर गाट यांनी संयोजकांकडे दिला. नंबर : 1573

2.यशवंत विचार मंच कुंभी-कारखना परिसरच्या पदाधिकार्‍यांनी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या ठिय्या आंदोलनात ठिय्या मांडून, आरक्षणाला पाठिंबा दर्शविला यावेळी अ‍ॅड.प्रकाश देसाई,दिलीप खाडे, बी.बी.पाटील, उदय पाटील, हिंदूराव हुजरे-पाटील, संजय पाटील उपस्थित होते. नंबर : 20180804

3. माजगाव (ता.पन्हाळा) येथील ग्रामस्थांनी गाव बंद पुकारून ठिय्या आंदोलनास पाठिंबा दिला.छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, संत ज्ञानेश्‍वर आणि अण्णाभाऊ साठे अशी वेशभूषा करून बालचमु यामध्ये सहभागी झाले होते. नंबर : 15890 किंवा 1623

4. सकल मराठा शेंडूर (ता.कागल) येथील ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलनास पाठिंबा दिला.शेंडूर ते कोल्हापूर चालत हे ग्रामस्थ आले होते. नंबर : 1628
5.शारीरिक शिक्षण शिक्षक संघाने मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन, ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. नंबर : 1625
कोल्हापूर ः कोल्हापूर शहरातील जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकार्‍यांनी मराठा आरक्षणास पाठिंबा देऊन ठिय्या मांडाला. नंबर ः 0028

कोल्हापूर ः जिल्हा बागडी समाज विकास मंडळाने मराठा आरक्षणास पाठिंबा दिला.यावेळी पाठिंब्याचे पत्र संयोजन समितीच्या दिलीप देसाई व हर्षल सुर्वे यांच्याकडे दिले.यावेळी समस्त बागडी समजाचे पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते. नंबर ः 0030