Fri, Apr 26, 2019 19:21होमपेज › Kolhapur › अकरावी प्रवेश : 9,304 अर्जांची विक्री

अकरावी प्रवेश : 9,304 अर्जांची विक्री

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 26 2018 12:49AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा समजल्या जाणार्‍या अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला सोमवार (दि. 25) पासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सर्व अभ्यासक्रमांसाठीच्या 9,304 प्रवेश अर्जांची विक्री झाली असून 1,145 अर्ज संकलन झाले आहे. गतवषीर्र्च्या तुलनेत पहिल्या दिवशी यंदा अर्ज विक्री कमी आहे. पाऊस असतानाही महाविद्यालयांत प्रवेश अर्ज घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. 
शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने शहरातील 33 कनिष्ठ महाविद्यालयांतील सुमारे 13,500 जागांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दहावीच्या परीक्षेची गुणपत्रके वाटपानंतर सोमवारी अर्ज विक्री व संकलनास प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी पाऊस असताना महाविद्यालयांत प्रवेश अर्ज घेण्यासाठी रांगा लागल्याने परिसर फुलून गेला होता. कोल्हापूर हायस्कूल, स. म. लोहिया हायस्कूल व ज्यु. कॉलेज, कॉमर्स कॉलेज, कमला कॉलेज, विवेकानंद कॉलेज, महावीर कॉलेज या अर्ज वितरण केंद्रांवर 9,304 अर्जांची विक्री झाली. 

महाराष्ट्र हायस्कूल व ज्यु. कॉलेज, पद्माराजे हायस्कूल व ज्यु. कॉलेज, गोखले कॉलेज, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, एमएलजी हायस्कूल, केएमसी कॉलेज या अर्ज संकलन केंद्रांवर 1,145 अर्जांचे संकलन झाले. विक्रीपेक्षा अर्ज संकलनाची संख्या फारच कमी आहे.