Thu, May 23, 2019 05:03होमपेज › Kolhapur › दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार कायम

दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार कायम

Published On: Mar 12 2018 1:30AM | Last Updated: Mar 11 2018 9:57PMकोल्हापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदान शाळा कृती समिती पदाधिकार्‍यांचे मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण सातव्याही दिवशी सुरु आहे. आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावल्याने प्रसाशनाने त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी उपचार करुन घेण्यास नकार दिला आहे. प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याबाबतचा निर्णय घेतल्याशिवाय कोल्हापूर विभागातील दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर शिक्षक ठाम आहेत. 

विनाअनुदानित शिक्षकांचे आझाद मैदानात उपोषण सुरुच आहे. 1 व 2 जुलै यांना अनुदानाचा मार्ग मोकळा झाला असला तरी 1628 शाळा व 2425 वर्ग तुकड्या यांना पुढील टप्पा देण्याबाबत शासनाने भूमिका सभागृहात स्पष्ट करावी अशी मागणी आहे. सकारात्मक भूमिका घेतली जाईल, आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घ्यावे असा निरोप शिक्षणमंत्र्यांनी पाठविला. परंतु कृती समितीने घोषणा होत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे जाहीर केले आहे. उपोषणकर्ते खंडेराव जगदाळे, वैजनाथ चाटे, विकास पाटील, महेंद्र वाघमारे यांची प्रकृती खालावली आहे. शासनाने याबाबत लवकरच भूमिका जाहीर करावी, अन्यथा मंगळवार (दि.13) रोजी सर्व राज्यातील विनाअनुदानित शाळा बंद करून मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मुंबईत दाखल होतील, अशी माहिती राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे सचिव प्रकाश पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.