Sat, Mar 23, 2019 01:59होमपेज › Kolhapur › १०८ कोटींच्या निविदेसाठी ‘वाटाघाटी’

१०८ कोटींच्या निविदेसाठी ‘वाटाघाटी’

Published On: Jan 16 2018 2:10AM | Last Updated: Jan 16 2018 1:34AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

शहरातील अंतर्गत जलवाहिन्या बदलण्यासाठी 108 कोटींचा निधी अमृत योजनेंतर्गत मंजूर झाला आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने निविदा प्रसिद्ध केली होती. या निविदेसाठी इच्छुक ठेकेदाराकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून 3 ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत.

यामधील सर्वात कमी दराच्या निविदाधारकाची निविदा महापालिका प्रशासनाकडून मंजूर करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी महापालिका प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, महापालिकेतील कारभार्‍यांनी ढपला पाडण्यासाठी ठेकेदाराबरोबर वाटाघाटी सुरू केल्याची चर्चा पालिका परिसरात सुरू आहे. यापूर्वीही अमृत योजनेंतर्गत मंजूर झालेल्या 59 कोटी रुपयांच्या ड्रेनेज लाईनच्या कामातही कारभार्‍यांनी मोठा ढपला पाडल्याचे बोलले जात आहे.