Sun, Nov 18, 2018 22:18होमपेज › Kolhapur › कोल्हापूर मनपाला १० कोटींचे अनुदान

कोल्हापूर मनपाला १० कोटींचे अनुदान

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील 14 महापालिकांना त्यांच्या क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी 367 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. कोल्हापूर महापालिकेला 10 कोटींचा निधी मिळणार आहे. यातून जी कामे करण्यात येतील, त्यातील संपूर्ण हिस्सा हा राज्य सरकारचाच राहणार असल्याने महापालिकांना त्यासाठी निधीची तरतूद करण्याची गरज पडणार नाही.

यासाठी तांत्रिक मान्यता दिल्याची खात्री जिल्हाधिकार्‍यांना करावी लागणार आहे. हे काम ई-निविदा पद्धतीने करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक स्वरूपाची व सार्वजनिक ठिकाणी ही कामे करण्याचे बंधन आहे. प्रकल्पाचा खर्च वाढल्यास त्यापोटी सरकारकडून वाढीव अनुदान देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जाहीर करण्यात आलेले अनुदान

अनुदानाची सर्वाधिक रक्‍कम ही मुंबई महापालिकेला देण्यात आली असून त्यांना 152 कोटी रुपये दिले जाणार आहेत.  नागपूर - 60 कोटी,  पुणे - 40 कोटी, नाशिक - 30 कोटी,  पिंपरी चिंचवड  व ठाणे प्रत्येकी  15 कोटी,  कोल्हापूर, सोलापूर व लातूर प्रत्येकी 10 कोटी, सांगली, चंद्रपूर, जळगाव, मिरा भाईंदर व नवी मुंबई प्रत्येकी 5  कोटी रुपये मिळणार आहेत.

 

Tags : kolhapur, kolhapur news, Kolhapur Municipal Corporation, grant,


  •