Tue, Jul 23, 2019 18:49होमपेज › Kolhapur › शाळांमध्ये अनधिकृत वर्ग चालविल्यास 1 लाख दंड

शाळांमध्ये अनधिकृत वर्ग चालविल्यास 1 लाख दंड

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 23 2018 12:51AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील 19 प्राथमिक शाळांमधील अनधिकृत सुरू ठेवलेल्या वर्गांची यादी जाहीर केली आहे. ‘आरटीई’ कायद्यानुसार अनधिकृत शाळांमधील असे वर्ग बंद न केल्यास 1 लाख रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाने यावर्षी मे 2018 अखेरपर्यंतच्या जिल्ह्यातील शाळांमधील शासनाच्या कोणत्याही मान्यतेशिवाय सुरू ठेवलेल्या अनधिकृत वर्गांची यादी मंगळवारी (दि. 22) जाहीर केली आहे. यात बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. कोल्हापूर शहरातील दोन शाळा आहेत. 

प्राथमिक शाळेचे नाव, अनधिकृतपणे सुरू ठेवलेल्यावर्गांची संख्या व माध्यम...विद्याभवन इंग्लिश मीडियम स्कूल, उजळाईवाडी - 1 ली ते 4 थी (इंग्रजी माध्यम), स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, उजळाईवाडी - 1 ली ते 4 थी (इंग्रजी माध्यम), जीनिअस पब्लिक स्कूल, भुये - 5 वी ते 7 वी (इंग्रजी माध्यम), यश इंग्लिश मीडियम स्कूल, पेठवडगाव - 1 ली ते 4 थी (इंग्रजी माध्यम), सेंट अ‍ॅस इंग्लिश मीडियम स्कूल, बाचणी - 6 वी ते 8 वी (इंग्रजी माध्यम), ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश मीडियम स्कूल, बाचणी - 6 वी ते 7 वी (इंग्रजी माध्यम), विद्यांजली प्राथमिक विद्यालय, कोंडिग्रे - 1 ली ते 7 वी (मराठी माध्यम), जे. पी. नाईक ग्लोबल स्कूल, बहिरेवाडी - 4 वी ते 7 वी (इंग्रजी माध्यम), एस. एन. इंग्लिश मीडियम स्कूल, आजरा - 6 वी (इंग्रजी माध्यम), रोझरी इंग्लिश स्कूल, वाटंगी - 7 वी (इंग्रजी माध्यम), शामराव दाभाडे केंद्रीय प्राथमिक शाळा, शाहूवाडी - 1 ली ते 7 वी (मराठी माध्यम), किलबिल विद्यामंदिर, गडहिंग्लज - 6 वी ते 7 वी (मराठी व इंग्रजी माध्यम), शिवराज इंग्लिश स्कूल, गडहिंग्लज - 8 वी (इंग्रजी माध्यम), हिरण्यकेशी नूल, गडहिंग्लज - 6 वी (इंग्रजी माध्यम), खतिजा सेमीउर्दू, चंदगड - 1 ली (उर्दू माध्यम), प्रेमांगण इंग्लिश स्कूल, चंदगड - 1 ली ते 3 री (इंग्रजी माध्यम), विद्यामंदिर यशोधा इंग्लिश मीडियम स्कूल, सावर्डे - 2 री ते 7 वी (इंग्रजी माध्यम), प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कोल्हापूर - 5 वी ते 8 वी (इंग्रजी माध्यम), राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल, कोल्हापूर - 1 ली ते 4 थी (इंग्रजी माध्यम).