Thu, Apr 25, 2019 23:46होमपेज › Kolhapur › ...तर उसाला 3,625 रुपये दर मिळाला असता

...तर उसाला 3,625 रुपये दर मिळाला असता

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 21 2018 1:13AMकुडित्रे : प्रा.एम. टी. शेलार

केंद्रीय कृषिमंत्र्यांनी 2005-06 मध्ये एफ.आर.पी. मध्ये केलेला दुसरा घातक बदल म्हणजे, 1980 पासून एफ.आर.पी.साठी (त्यावेळी एस.एम.पी./ मिनिमम सपोर्ट प्राईस) साडेआठ टक्के अ‍ॅव्हरेज पीक रिकव्हरी (उतारा) पायाभूत मानली जात होती. 2005-06 पासून हा पायाभूत उतारा 9 टक्के एवढा वाढवण्यात आला.

आणखी प्रतिटन 138 रुपयांनी  एफ.आर.पी. मारली!

पायाभूत उतारा 8.5 टक्क्यांऐवजी 9 टक्के केल्यामुळे पुन्हा पायाभूत उतार्‍यात अर्धा टक्‍का वाढ केली. म्हणजे, आताच्या दराने प्रतिटन 138 रुपयांनी ऊस दर घटला. शिफारशीनुसार पुढील हंगामात प्रतिटन 145 रुपयांची घट होणार आहे. म्हणजे एफ.आर.पी.मध्ये सूत्र बदल केल्यामुळे एकूण दोन टक्क्यांनी घट झाली आहे. म्हणजे सूत्र बदल केल्यामुळे 2017 - 18 च्या हंगामात  प्रतिटन 536 रुपयांनी ऊस दर घटविला. आगामी 2018-19 च्या हंगामात प्रतिटन 550 रुपयांनी ऊस दर घटणार आहे.

पुन्हा पायाभूत उतारा 9.5 टक्के

पुढे 2009-10 मध्ये एस.एम.पी.ची (किमान वैधानिक किंमत) एफ.आर. पी.( फेअर अ‍ॅण्ड      रेम्यूनरेटिव्ह प्राईस/ उचित व लाभकारी मूल्य) केली तरी पूर्वीचेच बदललेले सूत्र एफ.आर.पी.साठी कायम ठेवण्यात आले आणि तिसरा धक्‍का म्हणजे पायाभूत उतारा 9 टक्क्यांऐवजी 9.5 टक्के करण्यात आला. म्हणजे, पुन्हा ऊस दर अर्धा टक्क्यांनी म्हणजे प्रतिटन 134 रुपयांनी घटविला.

आगामी हंगामात पुन्हा सूत्र बदल

2018-19 च्या आगामी हंगामात पहिल्या 10 टक्के  उतार्‍याला प्रतिटन 2750 रुपये व पुढील एक टक्‍का वाढीस प्रतिटन 275 रुपये वाढ अशी एफ.आर.पी. आहे. सूत्र बदल नसता तर हा दर 8.5 टक्के  उतार्‍याला लागू झाला असता आणि 13.5 टक्के अ‍ॅव्हरेज पीक रिकव्हरीला प्रतिटन 4 हजार 125 ग्रॉस एफ.आर.पी. आली असती. तोडणी-वाहतूक खर्च वजा जाता प्रतिटन 3 हजार 625 दर (आता प्रतिटन 3075) मिळाला असता आणि वाजवी दरासाठी ऊस उत्पादकाला रस्त्यावर येण्याची गरजच भासली नसती.
                                                  
सूत्र बदल नसता तर...!
संपलेल्या 2017 -18च्या हंगामात पहिल्या 9.5 टक्के साखर उतार्‍याला प्रतिटन 2550 रुपये व पुढील एक टक्‍का वाढीस प्रतिटन 268 रुपये वाढ अशी एफ .आर.पी. आहे. सूत्र बदल नसता तर हा दर 8.5 टक्केउतार्‍याला लागू झाला असता आणि 13 टक्केअ‍ॅव्हरेज पीक रिकव्हरीला प्रतिटन 3 हजार 756 रुपये ग्रॉस एफ.आर.पी. आली असती. यातून प्रतिटन 500 रुपये तोडणी-वाहतूक खर्च वजा जाता प्रतिटन 3 हजार 256 रुपये दर मिळाला असता.
(क्रमशः)