Thu, Jun 27, 2019 17:50होमपेज › Kolhapur › ‘आरटीई’ प्रवेश : पहिल्या फेरीत 448 प्रवेश

‘आरटीई’ प्रवेश : पहिल्या फेरीत 448 प्रवेश

Published On: Apr 17 2018 1:53AM | Last Updated: Apr 16 2018 10:35PMकोल्हापूर : प्रतिनिधी 


‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेंतर्गत पहिली फेरी समाप्‍त झालेली असून 448 विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला आहे. 118 विद्यार्थी अपात्र ठरले असून 33 विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही. दि. 18 एप्रिलपासून दुसर्‍या फेरीस सुरुवात होणार आहे. बालकांचा मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा हक्‍क अधिनियम 2009 अन्वये (वंचित व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देण्यासाठी जागा राखीव ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहायित तत्त्वावरील प्राथमिक शाळांमध्ये 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 टक्के जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या राखून ठेवण्यात येतात. अशा बालकांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना मोफत सक्‍तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. 

शैक्षणिक वर्ष 2018-19 मधील 25 टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया student.maharashtra.govin र्सेींळप या लिंकवरील आरटीई पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. प्रवेश प्र्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातून 2880 ऑनलाईन अर्ज प्राप्‍त झाले. त्यापैकी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी 599 पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे एसएमएस पाठविण्यात आले. त्यानुसार चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. दुसरी फेरी दि.10 मे पर्यंत चालणार आहे. 

Tags : Kolhapur ,448, entry, first, round, RTE, entry