मॅजिक  पुरी पकोडा

Last Updated: Mar 12 2020 1:08AM
Responsive image

सौ. मंजिरी कपडेकर, पाककला तज्ज्ञ


आताची जी मॅजिक पुरी पकोडा यात पुरी लपवलेली आहे. मस्त मजेशीर असा हा पदार्थ आहे. 

साहित्य : पाणीपुरीच्या पुर्‍या, तयार बटाट्याची भाजी, बेसन ओवा, जिरे, खाण्याचा सोडा, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती : पाणीपुरीसाठी जशा वरून पुर्‍या फोडून घेतो तशा पुर्‍या फोडून घ्या. त्यात बटाट्याची भाजी भरून घ्या. 

बेसन पीठात, मीठ, ओवा, जिरे, सोडा घाला, पाणी घालून बॅटर तयार करा. या बॅटरमध्ये बटाट्याची भाजी, भरलेल्या पुर्‍या बुडवून तेलात तळून घ्या. मस्त गोल एकसारखे पकोडे तयार होतात.