Wed, May 22, 2019 16:16होमपेज › Kasturi › ‘दरोडेखोर’ येताहेत...

‘दरोडेखोर’ येताहेत...

Published On: Sep 07 2018 1:22AM | Last Updated: Sep 06 2018 8:17PMपूर्वीच्या काळचे मराठी वा हिंदी चित्रपटांमध्ये दरोडेखोराची व्यक्‍तिरेखा हमखास पाहायला मिळायची. कवठ्या महांकाल, कुबड्या खविस, तात्या विंचू यांसारख्या काल्पनिक कथानकांबरोबरच जरनेल सिंह, झबरसिंह, लाखनसिंह, रूपा, गब्बरसिंह यांसारख्या अनेक प्रसिद्ध दरडोखोरांच्या व्यक्‍तिरेखांनी रुपेरी पडद्यावर छाप उमटवली. 1963 मध्ये प्रसिद्धीला आलेल्या ‘मुझे जिने दो’  या चित्रपटातील ठाकूर जरनेल सिंहची भूमिका इतकी प्रसिद्ध झाली होती की ती भूमिका साकारणारा अभिनेता सुनील दत्तला चित्रपटांतील सर्वात प्रसिद्ध डाकू मानले गेले होते. केवळ सुनील दत्तच नव्हे तर विनोद खन्ना, धर्मेंद्र यांनीही दरोडेखोर म्हणून प्रसिद्धी मिळवली होती.  दरोडेखोरांवर आधारित चित्रपटांमध्ये सर्वात उल्लेखनीय चित्रपट आहे तो म्हणजे रमेश सिप्पी यांचा ‘शोले.’ अनेक बड्या सितार्‍यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटातील सर्वात आकर्षक भूमिका ठरली ती गब्बरसिंहची. अमजद खान यांनी साकारलेला गब्बरसिंग अजरामर ठरला. ‘मेरा गाव मेरा देश’मधला  झबरसिंह म्हणजेच विनोद खन्ना देखील उत्तम दरोडेखोराची भूमिका करणारा होता.   

- विधिषा देशपांडे 

शमशेराच्या भूमिकेत रणबीर

मागे एका मुलाखतीत रणबीरने त्याला दरोडेखोरांच्या नेत्याची भूमिका करायची आहे, असे म्हटले होते. अनेक वर्षांनंतर त्याची ही इच्छा पूर्ण होणार आहे. त्याच्या नव्या चित्रपटात तो डाकू शमशेराच्या भूमिकेत दिसणार आहे. यशराज फिल्मच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा करणार आहे. काही दिवसांपूर्वी आलेला चित्रपटाचा टीझर लोकप्रिय झाला होता. या मुख्य भूमिकेत रणबीर केलेला गेटअप उत्तम आहे. याची टॅगलाईन आहे ‘करम से डकैत, धरम से आझाद.’   
 

ठग्ज ऑफ हिंदुस्तान 

आमिर खान आणि अमिताभ बच्चन हे ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ मध्ये लुटारू असलेल्या चोरांच्या वेषातील दरोडखोर आहेत, असे सांगण्यात येत आहे. बीग बी आणि आमिर खान यांचा एकूण अवतार तरी असेच दर्शवतो. या चित्रपटाचे कथानक गमतीदार आहे. काही दरोडेखोर लुटालूट कशी करायची याचे प्रशिक्षण देतात. अशाच काही लुटांरूना या चित्रपटात दरोडेखोर म्हणून दाखवण्यात आले आहे. 

सुशांत - भूमी की ‘सोन चिरैया’

अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा प्रयोगशील अभिनेता म्हणून ओळखला जातो. नव्या पिढीतीला हा अभिनेता सातत्याने नवे काहीतरी करू इच्छित असतो. धोनीच्या बायोपिकमध्ये धोनीची भूमिका साकारल्यानंतर सतत नवे काही करून पाहण्याची ऊर्मी त्याच्या वर्किंग स्टाईलमध्ये स्वच्छ दिसून येते. सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणारा त्याचा नवा चित्रपट ‘सोन चिरैया’ मध्ये तो डाकूची भूमिका करतो आहे. त्यात अभिनेत्री भूमी पेडणेकर त्याची सहअभिनेत्री आहे जी डाकूची मुलगी आहे. ती सामाजिक अत्याचारामुळे लुटारू बनण्यास मजबूर झालेली असते. या चित्रपटात मनोज वाजपेयी आणि आशुतोष राणा यांच्याही भूमिका आहेत.