फॅशन-पॅशन : प्रिंटेड पँटस वापरताना...

Published On: Sep 12 2019 1:58AM | Last Updated: Sep 11 2019 7:43PM
Responsive image

सोनम परब


वेगवेगळ्या प्रिंट्स नेहमीच आऊटफिटला वेगळे स्वरूप देत असतात. तेच प्रिंटेड पँटस्च्या बाबतीत आहे. प्रिंटेड पँटस् या वेगवेगळ्या रंगात आणि रेंजमध्ये उपलब्ध असून यामध्ये अ‍ॅनिमल प्रिंटपासून आकर्षक फ्लोरल प्रिंटपर्यंत अनेक प्रकार उपलब्ध आहेत. प्रिंटेड पँट घातल्यानंतर इतर अटायर कसा असावा, याबद्दल जाणून घेऊ. 

प्रिंटेड पँट घातल्यानंतर त्यावर प्‍लेन टॉपचीच निवड करावी. कारण टॉपही प्रिंटेड घातला तर दिसायला ते अत्यंत वाईट दिसते. प्रिंटमधील एखादा रंग निवडून, त्या रंगाचे शक्यतो प्‍लेन टॉप घालावेत. टॉपची निवड करताना ते थोडेसे स्टायलिश असले पाहिजेत. प्रिंटेड पँटवर अतिशय टाईट टॉपची निवड करून घ्यावी. 

अ‍ॅक्सेसरीज ः यावर प्‍लेन टॉप घातला तरी एखादा प्रीटी नेकपिस यावर सुरेख दिसतो. अर्थात तो खूप ब्रॉड किंवा मोठा नसावा याकडे लक्ष द्यावे. हातामध्ये ब्रेसलेटस् किंवा वॉच घातले तर ते कॅज्युअल लूकसाठी चांगले दिसते. तसेच रंगीत पण प्‍लेन हँडबॅग आणि वॉलेटस् यांची निवड करावी. 

फुटवेअर ः प्रिंटेड पँटवर फुटवेअरची निवड करताना रंगाचे थोडे भान ठेवावे. तुमची पँट नॅचरल रंगाची अर्थात ब्लॅक अँड व्हाईट डिझाईनची असेल तर, अशा वेळी विरुद्ध रंगाचे, हॉट रंगाचे फुटवेअर निवडावेत. प्रिंटेड पँट घातल्यानंतर क्लासी लूक आणायचा असेल तर, त्यावर प्‍लेन आणि लाईट जॅकेट घालावे. अर्थात दिवसा लाईट रंगाची निवड करावी; परंतु रात्रीच्या वेळी गडद रंग चालतात. 

मेकअप आणि केशरचना ः प्रिंटेड पँट घातल्यानंतर मेकअपसाठी फार गडद शेडस् वापरू नयेत. आपण केलेला मेकअप नीट आणि शोभेल असा आहे हे बघावे. केशरचनेसाठी लूज वेणी, साईड पोनी किंवा मोकळे केसही चांगले दिसतात. केशरचना करताना आपल्या व्यक्‍तिमत्त्वाला थोडा गंभीर लूक येईल, याकडे लक्ष द्यावे.