Mon, May 27, 2019 07:21होमपेज › Kasturi › सुपर सिस्टर्सचे खर्‍या आयुष्यातले नातेही तितकेच घट्ट

सुपर सिस्टर्सचे खर्‍या आयुष्यातले नातेही तितकेच घट्ट

Published On: Sep 07 2018 1:22AM | Last Updated: Sep 06 2018 8:09PMकोणतीही मालिका असो, मग ती विनोदी असू दे वा कल्पनात्मक आशयाची... भावंडांमधले नाते नेहमीच घट्ट असते. भावंडांमधला बंध हा सर्वांत घट्ट बंध असतो आणि म्हणूनच पडद्यावरची भावंडेही प्रेक्षकांच्या मनात घर करतात. ‘सुपर सिस्टर्स’ या मालिकेतील या दोन बहिणींचे नातेही असेच दृढ आणि आदर्शवत आहे. सुपर सिस्टर्समधल्या शिवानी (वैशाली ठक्‍कर) आणि सिद्धी (मुस्कान बामणे) या पडद्यावरच्या बहिणी. शिवानी ही सर्वांशी प्रेमाने वागणारी, सर्वांना आदर देणारी गोड, निरागस मुलगी आहे आणि त्याउलट मुस्कान ही टिपीकल टॉमबॉय.

मालिकेत त्यांच्यातले नाते अगदी घट्ट आहे आणि त्या नेहमीच एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात. त्या एकमेकींसाठी प्रोटेक्टिव्ह असतात, एकमेकींवर खूप प्रेम करतात आणि प्रसंगी एकमेकींची ढालही बनू शकतात. वैशाली आणि मुस्कान यांनी नुकतेच कबूल केले आहे की, केवळ पडद्यावरच नव्हे तर खर्‍या आयुष्यातही त्यांचे नाते खूप घट्ट आहे. याबाबत वैशाली ठक्‍कर म्हणाली, ‘मला सख्खी बहीण नाही पण, मुस्कानने ती जागा भरून काढली आहे. या शहरात मला तिच्या रूपाने लहान बहीण मिळाली आहे, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते.’