Sat, Jul 20, 2019 13:49होमपेज › Kasturi › ’जिनी ची भूमिका साकारणार राशुल टंडन

’जिनी ची भूमिका साकारणार राशुल टंडन

Published On: Sep 07 2018 1:22AM | Last Updated: Sep 06 2018 8:06PMअल्‍लाउद्दीन - नाम तो सुना होगा’ या बहुप्रतिक्षित मालिकेतल्या जिनीच्या शोमधील प्रवेशाबाबत बोलताना राशुल टंडन म्हणाले, ‘लहान असताना मी अल्‍लाउद्दीनची कथा ऐकली आहे आणि मला ती खूपच आवडली. आता मोठेपणी ‘अल्‍लाउद्दीन - नाम तो सुना होगा’मध्ये जिनीची भूमिका साकारायला मिळणे म्हणजे स्वप्न साकार झाल्याप्रमाणे आहे. हा आनंदच काही निराळा आहे. मला आशा आहे आणि माझी इच्छा आहे की, दर्शकांनी मला जिनी म्हणून ओळखावे. जर त्यांनी मला जिनी म्हणून लक्षात ठेवले तर मी समजेन की एक कलाकार म्हणून मी यशस्वी झालो.’

या शोच्या सुरुवातीमध्ये, दर्शकांनी अल्‍लाउद्दीन (सिद्धार्थ निगम)च्या जीवनाचे विविध रंग पाहिले. जेव्हा जेव्हा अल्‍लाउद्दीनला वाटते की आता संकटे संपली तेव्हाच त्याला एक आवाज ऐकू येतो आणि दिव्यापर्यंत पोहोचण्याकरिता अल्‍लाउद्दीनसमोर आणखी एक संकट उभे राहते. अल्‍लाउद्दीन आपली बुद्धिमत्ता व हुशारीच्या बळावर आव्हाने पूर्ण करतो. पण जसा तो गुहेतून बाहेर निघू लागतो तेव्हा अचानकपणे दरवाजा बंद होतो.