अतिकौतुक नको 

Published On: Sep 12 2019 1:58AM | Last Updated: Sep 12 2019 1:58AM
Responsive image

स्वाती देसाई


आपल्या मुलांनी एखादं चांगलं काम केलं की, त्याचं कौतुक करावंसं वाटणं स्वाभाविक आहे. पण, त्यामध्ये फाजीलपणा आणि अतिशयोक्‍ती नको. मुलांच्या भविष्यासाठी ते घातक ठरू शकतं. 

आईवडिलांनी मुलांचं कौतुक करण्यापूर्वी दोन-तीन वेळा विचार करावा. कारण ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच लागलेल्या एका शोधानुसार मुलांना जरूरीपेक्षा जास्त मिळणारे कौतुक किंवा प्रतारणेचा मुलांवर गंभीर परिणाम होतो. ऑस्ट्रेलियन कॅथलिक युनिव्हर्सिटीचे संशोधक टोनी नोबेल यांनी  केलेल्या संशोधनानुसार मुलांचे कौतुक किंवा त्यांची प्रतारणा यांच्याशी मुलांचा आत्मविश्‍वास जोडलेला असतो. ज्या मुलांचं कौतुक जास्त केलं जातं, ती मुलं इतर मुलांना आपल्यापेक्षा कमी दर्जाची समजतात आणि स्वत:ला खूप खास असल्याचं समजतात. हा एक गैरसमज आहे की,  स्वत:मध्ये काही कमी असलेली मुलंच इतर मुलांना चिडवतात किंवा कमी लेखतात.

जर तुम्ही तुमच्या मुलांमध्ये विशेष अधिकाराची भावना जागवत असाल तर त्यांच्यात ही भावना निर्माण होते की, मला जी वस्तू हवी आहे ती मला मिळालीच पाहिजे.  यामुळे मुलांच्यात दांडगटपणा आणि आक्रमकता वाढते. म्हणून आईवडिलांनी मुलांचं कौतुक वास्तविक आणि खरं करावं. त्यात अतिशयोक्‍ती असू नये. त्याचबरोबर आईवडिलांचं आपल्या मुलांवर नियंत्रण असावं. मुलांना खरी परिस्थिती नेहमी सांगत रहावी.  त्यामुळे त्यांना हे समजेल की, चुका करणे किंवा नापास होणे म्हणजे वाईट गोष्ट नव्हे, तर  चुका याच आपल्याला पुढे योग्य मार्ग सुचवतात आणि आपण जास्त चांगली प्रगती करू शकतो.

थोडक्यात  आईवडिलांनी मुलांचं कौतुक करताना, तसंच त्यांची प्रतारणा करताना  नेहमी संयम ठेवावा. कारण अतिकौतुक जसं फाजील आत्मविश्‍वास वाढवितो तसंच अतिप्रतारणा किंवा नावं ठेवणं हेही अनेक मुलांचा आत्मविश्‍वास कमी करण्यासाठी कारण ठरते. त्यातून मनाने हळवी असलेली मुलं पुढे जाऊन आपल्या आयुष्याचा शेवट करायलाही मागेपुढे पाहत नाहीत.'या' स्मार्टफोन्सवर एक फेब्रुवारीपासून व्हॉट्सॲप पूर्णपणे बंद होणार!


'विराटचा चमचा' प्रतिक्रियेवर आकाश चोप्राचा पलटवार


निर्भयाचा मारेकरी पवनचा अल्पवयीन दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला


'रोहितने माझ्या 'त्या' आठवणींना उजाळा दिला'


शिक्षकांचा सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार


उस्मानाबाद : पिक विम्यासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून कृषी कार्यालयात तोडफोड


जे. पी. नड्डा भाजपचे नवीन अध्यक्ष; बिनविरोध निवड


बीड : टीईटी परीक्षेत गोंधळ; उत्तराचे पर्याय गायब


'चांद्रयान २' सॉफ्ट लँडिंगचा पीएम नरेंद्र मोदींकडून उल्लेख


भारतातील एक टक्के श्रीमंताकडे ७० टक्के लोकांपेक्षा जास्त संपत्ती