फॅशन-पॅशन : टॅटूचे डूज-डोण्टस्

Last Updated: Nov 14 2019 1:57AM
Responsive image
संग्रहित फोटो

अपर्णा देवकर


टॅटू किंवा गोंदण हे आज काल फॅशनचा एक ट्रेंड बनलाय. पूर्वी गोंदण म्हटले की काकुबाई... किंवा गा की गोरी.... अशाच काही नजरांनी पाहिले जायचे. तर काही पूर्वीच्या महिलांचे असे म्हणणे होते की गोंदण हे आपल्या शरीरावर कायमची एक खूण किंवा वेगळी अशी ओळख असते. मग त्यामध्ये पूर्वी तुळशीकट्टा हा दोन भुवयांच्यामध्ये गोंदवून घेण्याची प्रथा होती. पण आता त्याचे बदलते स्वरुप म्हणून टॅटू प्रचलित आलाय. टॅटू काढल्यानंतर थोडीशी काळजी घ्या.

एकच सुई वारंवार वापरल्याने कुष्ठरोग, कावीळ, एच. आय.व्ही. सारखे रोग होण्याची शक्यता असते. म्हणून एखाद्या अधिकृत केंद्रातच टॅटू गोंदवून घ्यावेत. टॅटू गोंदवून घेताना नवीन सुई वापरण्याचा आग्रह धरावा. मधुमेह, रक्‍तदाब, अ‍ॅलर्जी असणार्‍यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच टॅटू गोंदवण्याचा निर्णय घ्यावा. शरीराच्या ज्या भागावर टॅटू काढणार ती जागा टॅटू काढण्याअगोदर वॅक्सिंग करून घ्यावी. किंवा टॅटू काढल्यानंतर 10 दिवसांनी वॅक्सिंग करावे. टॅटू काढण्याअगोदर जेथे टॅटू काढणार तो भाग स्वच्छ धुवावा व कोरड्या टॉवेलने पुसावा. शरीराच्या ज्या भागावर अधिक नसा आहेत, ती जागा टॅटू काढण्यासाठी निवडू नये.

टॅटू काढलेल्या जागी मेंदी लावू नये. टॅटूसाठी कृत्रिम रासायनिक रंगाचा वापर न करता नैसर्गिकपणे उपलब्ध होणार्‍या ऑरगॅनिक रंगाचा वापर करावा. टॅटू काढल्यानंतर कडक उन्हात फिरण्याचे टाळावे.
टॅटू काढल्यानंतर दोन दिवस टॅटूची जागा साबणाने धुवू नये.