मन की बात : अवघे पाऊणशे वयमान...

Last Updated: Nov 06 2019 8:11PM
Responsive image

स्नेहल अवचट


केसांचा वाक... मानेचा बाक...
  पाठीचा विळा...  हाडांचा खिळा...
   म्हातारपण  हे नको मजला...
    नाही सुख नुसत्याच कळा...
     म्हणूनी लहानपण देगा देवा...

तसेही येणारे म्हातारपण हे दुसरे बालपणच तर असते.

माणसाचा आयुष्यात येणारे वयाचे टप्पे  पार करत  आजच्या धकाधकीच्या जीवनात, तणावात जो पुढे पुढे जात असतो तोच खरा खेळाडू व यशाचा हकदार म्हणावा लागेल. पूर्वीच्या काळी नाडी परीक्षेवरून काढे, मात्रा दिल्या जात. मुळात कष्टामुळे तब्येती सुद़ृढ असायच्या. सकस आहार, दूध-दुभते यामुळे माणूस निरोगी असायचा. जबाबदार्‍या, कर्तव्ये पार पडली की आधी संन्यासाश्रम व नंतर माणूस अन्न-पाणी वर्ज्य करून आनंदाने शरीराचा त्याग करायचा. अर्थात त्यासाठी  मन कमालीचे तयार असायचे, हे वेगळे  सांगायला नकोच!

हळूहळू सोयी, सुविधा, सुधारणा होत गेल्या व माणसाचे आयुष्य मान वाढू लागले. आता जे दुर्दैवाने  लहान वयात अकाली एक्झिट घेतात ती अतिशय दु:खद बाब आहे. पण, सरासरी जे आपले आखीव- रुटीनचे आयुष्य जगतात त्यांचा बाबतीत वय हा केवळ एक आकडा असतो, हे अगदी खरे.

ब्रह्मचर्यार्तील विद्यार्थिदशा संपवून माणूस गृहस्थाश्रमात प्रवेश करतो; प्रपंच, परिवार, जबाबदार्‍या यांची ओझी पार करत वानप्रस्थाश्रम इथे येऊन पोचतो. खरे तर याचा अर्थ म्हणजे आता निवृत्तीनंतरचे जीवन हे स्वतःसाठी जगायचे.सगळ्यातून मन काढणे व आपले अधिकार पुढील पिढीकडे सोपवून पुढील आयुष्य हे देवाच्या तसेच समाज सेवेत रमवावे व चिंताविरहित आयुष्य जगावे हाच अर्थ अभिप्रेत असतो.

पण आजकालच्या  धावत्या आयुष्यात लांबचे लोक जवळ असतात तर जवळचे नकोसे असतात. प्रत्येक माणसाला स्वतःसाठी  मन रमविणे जमतेच असे नाही. मी, माझे, मला, आपले वर्चस्व, सत्ता यातून सहजासहजी पाश सुटत नाहीत हे पण तितकेच खरे असते. काही जण पुढचा मागचा विचार न करता सर्व पैसा-आडका, घरदार मुलांच्या नावावर करून खरोखर चिंतामुक्त जीवन जगू पहातात. काही ठिकाणी सामंजस्याने ते लागूपण होते. पण काही ठिकाणी मात्र हा निर्णय हात दाखवून अवलक्षण  होऊन जाते. आर्थिकद़ृष्ट्या अवलंबून असेल तर सतत मानहानी, अपमान, याबरोबर पैशाची आवक थांबली म्हणून थोडी दुय्यम वागणूक,  तर कधी घरातून बाहेर काढणे, वृद्धाश्रम इथपर्यंत रवानगी  होऊ लागते व उतारवयात मनस्ताप व हतबलता  मात्र वाढू लागतो. काहीजण  मात्र  स्वतःचे सर्व  आर्थिक व्यवहार स्वत:कडे ठेवून आपला मान राखून घेतात. कारण त्या  ठिकाणी  स्वार्थीपणे नंतर तर आपल्याला मिळेल या आशेने तरी त्यांना बरी वागणूक मिळू शकते. पण काही ठिकाणी मात्र ही वयस्क खोडे अति हट्टी व दुराग्रही वागून पुढील पिढीला अगदी नको नको करून सोडतात.

अजरामर असे नटसम्राट हे नाटक या गोष्टींचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. पुढची पिढी ही व्यावसायिक जीवनात सक्रिय असते, तर निवृत्तीनंतरचे जीवन हे सैलसर, गोष्टी गांभीर्याने नको अशी मानसिकता असते. सून आपल्या मुलांना बाह्यजगात सक्षम होण्यासाठी झटत असते त्यामुळे जुन्या पिढीतील वेगळ्या पठडीतील शिकवणूक खटकते. पण  शेवटी मुद्दा हा सामंजस्याचा असतो. खटके विसरून पुन्हा एकत्र नांदणे यापेक्षा तू तू मै  मै करत मोडेन पण वाकणार नाही ही आग्रही मनोवृत्ती दोन्ही पिढीत दिसून येते. पण तरीही भावनिक संतुलनाच्या गाठीत प्रेम व द्वेष या दोन भावनांमधील सुवर्णमध्य असेल तरच घर हे घर राहू शकते, नाही का?

तर, असा हा जीवनाचा आशा निराशेचा खेळ असतो. कधी आकाशाची निळाई असते, तर कधी काळेकुट्ट मेघही असणारच! नुसते आयुष्य नाही, तर त्यातील प्रवास पण महत्त्वाचा आहे. कधीतरी जोडीदाराची अचानक झालेली एक्झिट मागच्या माणसाचे आयुष्य भकास करून जाते. मुले परदेशी असतील तर  माणसात राहण्याचे समाधान मिळावे यासाठी आपणहून वृद्धाश्रमाचा मार्ग रास्त वाटतो. उर्वरित आयुष्यात मीपणाचे गाठोडे सोडून दुःख सहन करत आनंद कसा वाटत रहायचा हा धडापण गिरवावा लागतो. 

अशा वेळी समवयस्क मित्र मैत्रिणी, आपले छंद, कला यात मन रमविणे म्हणजे जणू जादूची छडी असते... सुख दुःखाचे सम दुःखी व्यक्तीकडे  मन रिते करणे यामुळेसुद्धा मनाला हलके व ताजेतवाने वाटून जाते. जणू रोजची सकारात्मक ऊर्जाच. यात आता सर्व स्तरांवर कार्यरत असणारा  हास्य क्लब खरोखर सर्व वयस्क लोकांना एक आशेचा किरण आहे. इथले व्यायाम, झेपेल असे खेळ, कवायती, योग, ध्यान, प्राणायाम, त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने तनामनाला जणू तजेला देत असतो. आपल्या धावपळीच्या आयुष्यात जणू हसणेच विसरून गेलो की काय असे आपल्याला जाणवते. पण, या लोकांना हसण्याचे विविध व्यायामप्रकार खरोखर  मानसिक बळ देतात हे मात्र नक्की....

याची देही याची डोळा आम्ही नुकताच  हा अनुभव घेतला. निमित्त होते आमच्या आईच्या  अमृतमहोत्सवाचे.  तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा!  ...त्या सर्वांच्या उपस्थितीत असलेली आई आम्हाला एक वेगळीच उत्साही, चैतन्यमयी  वाटली. बाबांच्या अचानक जाण्याने  वयाच्या पंचेचाळीशीला  स्वतःचा विचार न करता आई आमच्यासाठी न खचता उभी राहिली. आयुष्यातील खाचखळगे, सुख-दुःख याचा आलेख रोज बदलत असायचा.  नुसतेच उन्हाळे, पावसाळे नव्हतेच. पण त्यातून तरून जायची  तिची एक खास अदा होती. ही कलाकुसर करताना येणारे अनुभव, आनंदी क्षण, दुःखाचे कढ हे अनमोल करायचे की मातीमोल हे ज्याचे त्याचे कसब असते. सुख-दुःखाची ही मायेची वीण कधी उसवते तर कधी फाटण्याची शक्यता निर्माण होते तेव्हा ते टाके जोडणे, तर कधी रफू तर कधी घट्ट वीण घालून सांधणे व नाती टिकवणे ही एक कलाच   तिच्यात ओतप्रोत  आहेच!
आई, तू अशीच सर्व बाजूंनी ठाम उभी राहून आम्हाला उभे केलेस, अशा तुझ्या अमृतमयी आयुष्यात आम्ही भरून पावलो..!! 
सरतेशेवटी मला सर्व ज्येष्ठांना इतकेच म्हणायचे आहे...
       

            निरोगी सदा कार्यरत असावे
           प्रफुल्लित जगा सुखे तृप्त व्हावे
           वसंतऋतू बहरो तुमच्या जीवनी
           हीच शुभेच्छा सदैव आमुच्या मनी

काल इटलीला, आज स्पेनला मागे टाकले; भारतात कोरोनाग्रस्तांची विक्रमी वाढ सुरुच!


धुळ्यात आणखी २० रुग्णांची भर


पन्हाळा : गाडीला धडकून जखमी झालेल्या रान मांजराला जीवदान (video)


भाजप नेते कपिल मिश्रांच्या भडकावू भाषणांमुळे दिल्ली हिंसाचाराला प्रोत्साहान : मार्क झुकेरबर्ग


जालन्यात कोरोनाबाधितांची संख्या दोनशेच्या उंबरठ्यावर


'कोळसा खाणींचा योग्य उपयोग केल्यास वीजनिर्मितीची गरज संपूर्ण भागेल'


भारतीय हद्दीत घुसखोरी; चीनच्या आडमुठेपणामुळे चर्चा निष्फळ


रक्तबंबाळ, भुकेने व्याकुळ होऊन चालत घरी गेलेल्या मजुरांसाठी आता 'पायघड्या'


औरंगाबादेत आज झाली ६४ रुग्णांची वाढ


तासगाव : पेड गावात मुंबईवरून आलेल्या तरूणाला कोरोना