Tue, Apr 23, 2019 01:39होमपेज › Jalna › बेवारसांना जेंटलमन बनवण्याचा ध्यास !

बेवारसांना जेंटलमन बनवण्याचा ध्यास !

Published On: Feb 09 2018 2:03AM | Last Updated: Feb 09 2018 2:01AMजाफराबाद : प्रतिनिधी

वेडसर, भोळसर, मनोरुग्ण, बेवारसांची स्वच्छता करून त्यांना ‘माणूस’ बनवत आहे. दवाखान्यात जाऊनही त्याची मोफत  दाढी, कटिंग नाभिक समाजातील तरुण सुमित पंडित करीत आहे.

मोठ्या शहरात अथवा छोट्या शहरातही आपल्याला मनोरुग्ण हमखास पाहावयास मिळतात, परंतु त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. पाहून पुढे निघून जातात. मात्र सुमित पंडित यांनी समाजसेवेचा वसा हाती घेऊन ते विविध उपक्रम राबवतात. 

यापूर्वी त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. संकलित रक्‍त औरंगाबाद घाटी तसेच  अनेक दवाखान्यांना पुरवले आहे. विविध शाळांमध्ये शालेय साहित्यांचे वाटप करणे, जनजागृतीसाठी शहरात तथा ग्रामीण भागात नारदी कीर्तन करतात. बेवारस व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची दाढी व  कटिंग करणे अशा व्यक्‍तींना अंघोळ घालून त्यांना नवे कपडे देणे आदी उपक्रमही त्यांनी केले आहे. 

औरंगाबाद, नागपूर, सिल्लोड, पैठण, राजूर, अंभई, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा विविध ठिकाणी त्यांनी समाजकार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्यास  अण्णासाहेब फलके, विजय बोर्डे, योगेश भारद्वाज, धंनजय ढवळे, संजय छडीदार, गणेश ढवळे, सचिन पंडित, रुपेश ढवळे, शिवाजी छडीदार , अमोल ढवळे, मनोज खेडेकर, रामेश्वर उबाळे, गजानन सरडे, दीपक पंडित, समाधान बोराडे आदींनी शुभेच्छा दिल्या.