Sat, Feb 23, 2019 16:18होमपेज › Jalna › सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 05 2018 12:43AMआष्टी : प्रतिनिधी

दोन लाखांसाठी होत असलेल्या छळामुळे परतूर तालुक्यातील कार्‍हाळा येथील विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी पतीसह सासरकडील चार जणांविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्‍हाळा येथील माऊली शरद सोळंके याचे दोन वर्षांपूर्वी धानोरा येथील नारायण खंदारे यांची मुलगी प्रतीक्षा हिच्याबरोबर लग्न झाले होते. त्यावेळी संसारपयोगी  साहित्यासह अडीच लाख रुपये हुंडा दिला होता. त्यांना एक मुलगाही आहे. मात्र घराच्या बांधकामासाठी माहेराहून आणखी दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणत पती माऊली, सासू संजीवनी, सासरे शरद व दीर तुकाराम छळ करीत असल्याने प्रतीक्षाने शुक्रवारी पेटवून घेतले. तिला परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी नारायण खंदारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार करीत आहेत.