Tue, Nov 13, 2018 10:07होमपेज › Jalna › माळरानावर फुलवली कलिंगडाची शेती

माळरानावर फुलवली कलिंगडाची शेती

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 09 2018 1:32AMपारध : प्रतिनिधी

खडकाळ जमिनीवर पाण्याचे नियोजन करून भोकरदन तालुक्यातील पारध येथील तरुण समाधान विठ्ठल काटोले याने 4 एकरमध्ये कलिंगडाची शेती फुलवली आहे. याचा आदर्श पारध येथील शेतकरी घेत असून काटोलेंच्या  शेतीला भेट देऊन पाहणी करीत आहे 

पडिक पडलेल्या नापीक जामिनीमध्ये जिद्द, चिकाटी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून खडकाळ जमिनीवर 4 एकर जमिनीमध्ये कलिंगड शेती काटोले यांनी केली. यासाठी मल्चिंग पेपरचा वापर केला. रोगाचा प्रादुुर्भाव होऊ नये, यासाठी औषधींचा योग्य वापर करून चार एकरांमध्येे एक लाख सत्तर हजार रुपये खर्च करून कलिंगडाची बाग फुलवली. शेतीमध्ये जास्त उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने काम करून 8 बाय दीडवर कलिंगडाची लागवड केली. एकरी 4 हजार खोडाची लागवड केल्यानंतर आज एका झाडाला 4 ते 5 फळे लागलेली दिसत आहे. त्याचे वजन 4 ते 5 किलोच्या आसपास असून काढणीला येण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी आहे. 

नोकरी सांभाळून

औरंगाबाद येथील बारवीला पेस्टिसाईड कंपनीचे काम करून सुटीच्या दिवशी शेतीमध्येे लक्ष देऊन खत, पाणी व औषधीचे नियोजन केले. सरासरी चार एकरांमध्ये पाच ते सहा लाखांचे उत्पन मिळणे अपेक्षितआहे.
- समाधान काटोले, शेतकरी
 

Tags : watermelon farm, jalana news