Wed, Jul 17, 2019 10:29होमपेज › Jalna › पाणीपुरवठा योजना अखेर हस्तांतरित

पाणीपुरवठा योजना अखेर हस्तांतरित

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 04 2018 12:50AMमंठा : प्रतिनिधी 

शहराचा पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी सुटावा म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने 15 कोटी 37 लाख रुपयांची कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना  एक वर्षापूर्वी कार्यान्वित करण्यात आली. या योजनेचे हस्तांतरण नुकतेच नगर पंचायतकडे करण्यात आले.

शहराच्या पाणी प्रश्‍नाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची योजना एक वर्षापूर्वी कार्यान्वित करण्यात आली. नळाला मीटर बसविण्यात आले. तीन महिन्यांत ही योजना नगर पंचायतकडे हस्तांतरित करणे अपेक्षित होते, परंतु नळ योजना पूर्ण क्षमतेने काम करते की नाही.त्यामध्ये काही लिकेजेस किंवा आक्षेप पाहून त्याची पूर्तता करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. परंतु मागील एक वर्षापासून योजनेचे हस्तांतरण रखडले होते.शेवटी मागील आठवड्यात नळ योजना हस्तांतरणा बाबतचा ठराव घेऊन नगरपंचायतने ही योजना आपल्याकडे वर्ग करून घेतली.

या योजनेच्या अंतर्गत जलवाहिनीसाठी पाईप टाकताना शहरातील अनेक रस्ते फोडण्यात आले. नळ योजना पूर्ण झाल्यानंतर रस्ते दुरुस्ती करण्यात येईल, असे सांगण्यात आले, परंतु प्रत्याक्षात रस्ते दुरुस्ती करण्यात आले नाही. खोदकामामुळे सिमेंट रस्त्याचे विद्रूपीकरण झाले आहे. दुचाकी चालविताना व पादचार्‍यांना चालताना त्रास होत आहे. शहरातील महत्त्वाची असणारी ही कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना चालविण्याचे मोठे आवाहन नगर पंचायतकडे आहे.