Sat, Nov 17, 2018 23:27होमपेज › Jalna › आन्वा पाडा गावात पाणीटंचाईचे उग्र रूप

आन्वा पाडा गावात पाणीटंचाईचे उग्र रूप

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 10 2018 11:45PMआन्वा : प्रतिनिधी 

भोकरदन तालुक्यातील आन्वा पाडा या गावावर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याने महिला व ग्रामस्थांचे हाल  होत आहेत.आन्वा परिसरातील नदी, नाले, विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावलेली असून या गावांना पाणीटंचाई गंभीर होणार आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे. 

आन्वा पाडा गावशिवारात असलेल्या शेतातील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. गावात पिण्याच्या पाण्याची सोय करून उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.  यावर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. ग्रामस्थांना हंडाभर पाण्याकरिता पायपीट करावी लागत असल्याने त्वरित टँकर सुरू करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

बैलगाडीवर आणले जाते पाणी

पाण्यासाठी महिलांसह मुलांवर भटकंतीची वेळ आली आहे. बैलगाडीवर ड्रम टाकून शेतातील विहिरीतून पाणी आणले जाते. काही जण तर मोटारसायकलला कॅन लावून,  काही जण मिळेल त्या विहिरीतून पाणी आणताना दिसत आहे. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Tags : Jalna,  water, scarcity , Anwa Padha, village