Mon, May 27, 2019 00:39होमपेज › Jalna › अज्ञात वाहनाची धडक; दुचाकीस्वार ठार

अज्ञात वाहनाची धडक; दुचाकीस्वार ठार

Published On: May 01 2018 1:15AM | Last Updated: Apr 30 2018 11:05PMभोकरदन : प्रतिनिधी

विरेगावजवळ सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील एक ठार तर एक जण जखमी झाला. सोमीनाथ शेळके असे ठार झालेल्याचे नाव आहे. अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी मोबाईलद्वारे घटनास्थळाचे अनेकांनी चित्रण केले. मुर्दाड मानसिकतेचे दर्शन यानिमित्त घडून आले.

भोकरदन-जाफराबाद रस्त्यावरील वीरेगावनजीक प्रल्हादपूर येथील सोमिनाथ रामराव शेळके (28) व फत्तेपूर येथील रामेश्‍वर साहेबराव बरडे (26) हे दुचाकीने (एम.एच.20-सी.722) वीरेगावकडे जात होते. याच दरम्यान पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. काही वेळानंतर शिवसेनेचे मनीष श्रीवास्तव व इतरांनी जखमींना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना औरंगाबाद येथे नेत असताना सोमीनाथ शेळके यांचा मृत्य झाला. रामेश्‍वर  यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. सोमीनाथ यांना मुलगा, मुलगी, आई, पत्नी, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

माणुसकी हरवली : मनीष श्रीवास्तव 

आम्ही भोकरदनकडे जात असताना अपघात झाला. अपघातस्थळावर दोन जण जखमी अवस्थेत भररस्त्यात पडलेले होते. दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीची मदतीची गरज होती. मात्र अनेकजण आपल्या मोबाईलमध्ये चित्रण करीत होते. जखमी सोमीनाथ शेळके यांना तातडीने रुग्णालयात नेले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते, असे शिवसेना नेते मनीष श्रीवास्तव यांनी सांगितले.

Tags : jalna, unknown vehicle, Two-wheeler acciden,