Sun, Jun 16, 2019 02:11होमपेज › Jalna › गणवेशाची रक्कम अखेर खात्यावर 

गणवेशाची रक्कम अखेर खात्यावर 

Published On: Jul 26 2018 1:32AM | Last Updated: Jul 22 2018 11:51PMभोकरदन : प्रतिनिधी

सर्व शिक्षा अभियानांतर्गत वर्ष 2018-19 मध्ये सर्व मुली, अनुसूचित जाती-जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना गणवेशासाठी लागणारा निधी शालेय समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात आला.
देण्यात येणारा निधी केव्हा मिळणार, पात्र विद्यार्थी गणवेशापासून वंचित हे वृत्त दैनिक पुढारीने सातत्याने प्रकाशित केल्यानंतर जिल्हा परिषदेने तातडीने दैनिक पुढारीच्या वृत्ताची दखल घेतली. 19 जुलै रोजी तालुक्यातील शालेय व्यवस्थापन समित्यांच्या खात्यावर 1 कोटी 27 लाख 69 हजार 600 रुपयांचा निधी वर्ग केला आहे. दरम्यान यावर्षी यात वाढ करण्यात आली आहे. थेट शाळा व्यवस्थापन समितीलाच पूर्ण अधिकार प्रदान करण्यात आले आहे.

दरम्यान, निर्णय झाल्यानंतर सुद्धा हा निधी जिल्हास्तरावर पडून होता. दरम्यान 22 जून रोजी दैनिक पुढारीने या संदर्भात सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. 21 हजार 200 विद्यार्थ्यांना केव्हा गणवेश मिळणार असा सवाल पालक वर्गातून उपस्थित करण्यात येत होता. 

दैनिक पुढारीने वेळोवेळी विद्यार्थ्यांची बाजू उचलून धरली होती.जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा रंग ठरविण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आला आहे.21 हजार 283 विद्यार्थ्यांना 600 प्रमाणे 1 कोटी 27 लाख 69 हजार 600 निधी आता 19 जुलै रोजीच ज्या त्या शालेय व्यवस्थापन समित्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.भोकरदन तालुक्यातील 21 हजार 283 विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये सर्व संवर्गातील 15 हजार 630 विद्यर्थिनी, एससीमधील 2 हजार 513, एसटीचे 746 तर बीपीएल मधील 2 हजार 394 अशा एकूण 21 हजार 283 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 

31 जुलैपर्यंत गणवेश देण्याचे आदेश : नेव्हार

दरम्यान आता विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे ज्या त्या शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जिल्हा कार्यालयातूनच वर्ग करण्यात आल्याने गणवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे, मात्र सर्व शाळांनी ता.31 जुलैपर्यंत सर्व पात्र विद्यार्थ्यांना गणवेश द्यावा, असे आदेश देण्यात आले असल्याचे गटसमन्वयक एस.बी.नेव्हार यांनी सांगितले. 

पालकवर्गातून समाधान 

शालेय समितीच्या खात्यावर गणेवश निधी जमा झाल्याने शालेय समिती सदस्यांसह पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पंधरा ऑगस्टपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना गणेवश मिळण्याची आशा आहे.