Sun, Aug 25, 2019 04:21होमपेज › Jalna › वेगवेगळ्या घटनांत दोघांचा मृत्यू

वेगवेगळ्या घटनांत दोघांचा मृत्यू

Published On: Feb 05 2018 2:03AM | Last Updated: Feb 04 2018 11:23PMपरतूर : प्रतिनिधी

तालुक्यामध्ये शनिवार व रविवारी दोन घटनांमध्ये माव पाटोदा व  येणारा या गावातील दोन जणांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी पाटोदा येथील साहिल शफी शेख (15) दहाच्या सुमारास परतूरहून दुचाकीने येत  होता. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला त्याची दुचाकी धडकली. यात  साहिल शेखचा मृत्यू झाला. 

शॉक लागून मृत्यू 

दुसर्‍या घटनेत रविवारी येणोरा गावात घडली. शेतातील विहिरीत उतरून विद्युत मोटार सुरू करीत असताना संजय अप्पासाहेब भुंबर (35) याचा शॉक लागून मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, तालुक्यात दोन दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला.

परतूरमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

परतूर : प्रतिनिधी

येथील योगानंद माध्यमिक विद्यालयातील बारावीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. विशाल अशोक शेळके (17) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. 

विशालचे वडील डॉ. अशोक शेळके यांचे मोंढा भागात पॅथोलॉजी लॅब आहे. ते पत्नी व मुलासोबत हुर्डापार्टीसाठी शेतात गेले होते. हा प्रकार नोकराच्या लक्षात आला. त्याने तत्काळ डॉ. शेळके यांना माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक एन.वाय. अंतरप यांनी पंचनामा केला. शव विच्छेदानासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. यावेळी माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, शिवसेनेचे जिल्हाउप प्रमुख माधवराव कदम आदींनी घटनास्थळी भेट दिली. दोन वर्षांपूर्वीच विशाल याच्या मोठ्या बहिणीने आत्महत्या केली होती.  आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.