Wed, Sep 26, 2018 18:04होमपेज › Jalna › गुप्तधनासाठी खोदकाम करणार्‍या भावांना अटक

गुप्तधनासाठी खोदकाम करणार्‍या भावांना अटक

Published On: Aug 06 2018 1:52AM | Last Updated: Aug 08 2018 1:49AMजालना : प्रतिनिधी

जुना जालन्यातील कपूर गल्ली येथील स्वतःच्या घरात गुप्तधनाचा शोध घेणार्‍या दोघा भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई कदीम व चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आली. 

याबाबत पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे विशेष पथकाने जुन्या जालन्यातील कपूर गल्लीत स्वतः च्या घरात गुप्तधन व महादेवबाली मूर्तीच्या शोधासाठी आरती व पूजा करून खड्डे खोदून शोध घेणार्‍या शिवाजी देवराव आवघड (42) व ज्ञानेश्‍वर देवराव आवघड या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची खोली दहा बाय दहा असून या खोलीत दोन चार बाय अडीचे दोन खड्डे तीन फुटापर्यत खोदण्यात आले होते. याशिवाय या खोलीत कुदळ, फावडे, प्लास्टिक टोपले, हळद, कुंकू, अगरबत्ती, साखर, पाण्याचा ड्रम आदी साहित्या आढळून आले आहे. गुप्तधन व मूर्तीसाठी खोदकाम केले असल्याचे त्यांनी सांगितले.