Tue, Mar 19, 2019 21:01होमपेज › Jalna › बदलीमध्ये 217 शिक्षकांना एकही गाव नाही

बदलीमध्ये 217 शिक्षकांना एकही गाव नाही

Published On: May 25 2018 1:09AM | Last Updated: May 24 2018 11:23PMजालना : प्रतिनिधी

बहुचर्चित जिल्ह्यातंर्गत शिक्षक बदल्याचे आदेश गुरुवारी (दि.24) धडकले आहेत. जिल्ह्यातील एकूण सहा हजार शिक्षकांपैकी जवळपास 2 हजार 277 शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून त्यापैकी 217 शिक्षकांना एकही गाव न भेटल्यामुळे विस्थापित व्हावे लागले आहे. या बदल्या आदेशामध्ये  शिक्षकांवर अन्याय झाला असल्याचा आरोप  शिक्षक संघटना समन्वय समितीने केला आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदलीची ऑनलाइन प्रक्रिया गुरुवारी पार पडली आहे. जि.प.चे एकूण 6 हजार 169 शिक्षक असून यौपकी तीन हजार 24 शिक्षक बदलीपात्र होते. त्यातून 2277 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहे. तर 217 शिक्षकांना एकही गाव न भेटलेले (विस्थापित) शिक्षक आहे. या बदल्या प्रक्रियेत शासन निर्णयाला डावल्याने आल्याचे शिक्षकांकडून बोलले जात आहे. या बदली प्रक्रियेत  27 फेबु्रवारी 2017 च्या जिल्हांतर्गत बदली शासन निर्णयानुसार तीस कि.मी.च्या बाहेरील पती-पत्नीस संवर्ग दोनचा लाभ देऊन एकत्र करण्यात आले, परंतु तीस किमीच्या आतील पती-पत्नीच्या शासन निर्णयाचा कुठलाही लाभ न देता त्यांना विस्थापित करण्यात आले आहे.

सेवाज्येष्ठ शिक्षकांना पसंतीनुसार गावे न मिळता सेवा कनिष्ठ असलेल्या शिक्षकांना गावे  मिळाली, या प्रक्रियेत चारही संवर्गाच्या बदल्या सोबतच केल्यामुळे संवर्ग चारमधील लोकांवर अन्याय झाला आहे. आंतरजिल्हा बदलीने रिक्त झालेल्या जागा या संवर्गचारसाठी उपलब्ध करून दिलेल्या नव्हत्या. संवर्गनिहाय ही प्रक्रिया राबविली असता सवार्र्ंना न्याय मिळाला असता. मात्र संवर्ग एक व दोनच्या रिक्त जागा संवर्ग चारसाठी दाखविल्या नाहीत. त्यामुळे बदल्यांचे प्रमाण वाढले असल्याचे समन्वयक समितीने म्हटले आहे.