Sun, Mar 29, 2020 08:47होमपेज › Jalna › जालना : कोरोनाची बोगस लस पाजणाऱ्या तीन महिला जेरबंद

जालना : कोरोनाची बोगस लस पाजणाऱ्या तीन महिला जेरबंद

Last Updated: Mar 12 2020 12:29PM

संग्रहित छायाचित्रगोंदी : पुढारी वृत्तसेवा

कोरोना हा व्हायरस बरा होतो म्हणत बोगस लस लहान मुलांना पाजण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत बोगस लस पाजणाऱ्या तीन महिलांना जेरबंद केले. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ९ मार्च रोजी साष्टपिंपळगाव, आपेगाव, गेवराई तालुक्यातील पंचाळेश्वर या ठिकाणी अज्ञात तीन महिला आल्या होत्या. त्यांनी सरकारी दवखान्याच्या परिचारिका आहे, असे सांगत या ठिकाणी सर्व्हे केल्याचे ग्रामस्थांना सांगितले. त्यावेळी त्यांनी कोरोनो हा विषाणू बरा होतो म्हणत दाहा ते बारा मुलांना लस दिल्या. तसेच ५० ते ६० रुपयेही घेतले. याबाबत शासनस्तरावर योग्य दक्षता घेण्यात येत असतानाच असा प्रकार होत आहे. हे पाहत काही नागरिकांनी याची तक्रार वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शहागड यांच्याकडे केली. ही बाब लक्षात येताच वैद्यकीय अधिकारी यांनी साष्टपिंपळगाव येथे जाऊन नागरिकांची तक्रार ऐकून घेतली. त्यावेळी त्या त्या महिला दिनांक ९ रोजी पुन्हा येणार असल्याची वैद्यकीय अधिकारी आणि ग्रामस्थांना माहिती मिळाली.  

त्यामाहितीच्या आधारे वैद्यकीय अधिकारी महादेव मुंडे, एन.एम अर्चना, रघुनाथ पारखे आणि गावकऱ्यांनी त्या महिलांना पकडले. राधा रामनाथ सामसे (वय ३५ वर्ष रा. साक्षाळ पिंप्री ता.जि.बीड) सिमा कृष्णा आंधळे (वय ३० वर्ष रा. रुईपिपंळा ता.वडवणी जि.बीड) सगिंता राजेंद्र आव्हाड (वय ३६ रा डोईफोड वाडी ता.जि.बीड) असे पकडण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्र, बनावड लस पोलिसांनी जप्त केली आहे.