Sat, Jul 20, 2019 10:53होमपेज › Jalna › दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या

दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जालना : प्रतिनिधी

येथील औद्योगिक वसाहतीतील शीला व पंकज इंडस्ट्रिज या कंपनींवर आठ ते नऊ दरोडेखोरांंंंंनी दरोडा टाकून 13 लाख 87 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना बुधवार, 21 मार्च रोजी घडली होती. यातील सात दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांच्या ताब्यातून 13 लाख 87 हजारांचा ऐवज व  गुन्ह्यात वापरण्यात आलेली 9 लाखांची आयशर असा एकूण 22 लाख 87 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. 

औद्योगिक वसाहतीतील शीला व पंकज इंडस्ट्रिज या दोन कंपन्यांवर बुधवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास आठ ते नऊ दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यावेळी कंपनीच्या वॉचमनला चाकूचा धाक दाखवत हातपाय बांधून टाकले होते. दरोडेखोरांनी ट्रान्सफार्मर दुुरुस्तीसाठी आलेली तांब्याची तार, पट्टी स्क्रॅप, ब्रास रॉड, मोटरसायकल, एलसीडी, मोबाइल असा एकूण 13 लाख 87 हजारांचा मुद्येमाल लुटून नेला होता. रात्री गस्तीवर असलेले स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी घटनास्थळाला भेट दिली. 

तपासादरम्यान गौर यांना खबर्‍याने दिलेल्या माहितीवरून मुंबई येथून उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगर जिल्ह्यातील तेनवा येथून दरोडेखोरांना पकडण्यात आले. अब्दुल्ला जमीरउल्ला अन्सारी, अब्दुल सईम मोहम्मद युनूस, असलम अली अक्रम अली, अब्दुल सलीम खान, मोहम्मद इम्रान निजायोद्दीन, अकबर अबीदखान इरशाद अहेमद खान अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना एका पाठोपाठ एक ताब्यात घेतले. आरोपींनी चोरी केल्याची कबुली देत चोरीस गेलेला 13 लाख 87 हजारांचा ऐवज व दरोड्यात वापरलेला 9 लाख रुपयांचा आयशर ट्रक पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई जिल्हा पेालिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिह गौर, पोलिस उपनिरीक्षक सुनील इंंगळे, शेख रज्जाक, संतोष सावंत, प्रशांत देशमुख, कैलास जावळे, समाधान तेलंग्रे, वैभव खोकले, रंजित वैराळ आदींनी केली. 


  •