Wed, Jul 17, 2019 18:02होमपेज › Jalna › तापमानाने गाठली चाळिशी

तापमानाने गाठली चाळिशी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जालना : प्रतिनिधी 

शहराच्या तापमानात चांगलीच वाढ झाली असून, मे हिटचा तडाखा मार्च एंडलाच जाणवू लागला आहे. शहराच्या तापमानाने चाळिशी ओलांडली असल्याने जालनेकर चांगलेच घामाघूम होऊ लागले आहेत. वाढत्या तापमानामुळे दुपारी उष्णतेच्या झळा लागू लागल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहे. उकाड्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ए. सी. कुलर, पंख्यांचा वापर वाढला आहे, तर शीतपेयांच्या स्टॉलवर गर्दी  होत आहे. 

गेल्या आठवड्यापासून शहरासह जिल्हाभरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तीन दिवसांंपासून पारा वाढला असून, तो शुक्रवारी  40 अंश सेल्सियस अंशांवर गेला. गुरुवारी पारा 38 अंशांवर तर बुधवारी 37 अंशांवर पोहोचलेला होता. अवघ्या तीनच दिवसांत पारा हा 40 अंशांवर पोहचल्याने या वर्षीचा उच्चांक गाठला आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उष्म्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. यामुळे अंगाची लाही लाही  होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसत आहेत. यामुळे घराबाहेर पडताना उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून टोपी, गॉगल, छत्री, सनकोटचा वापर केला जात आहे. थंडावा मिळण्यासाठी शीतपेयांच्या स्टॉलवर गर्दी होत आहे, तर रणरणत्या उन्हामुळे दुपारी 1 ते 4 या वेळेत रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत आहे.
 मार्च महिना मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात कमी त्रासदायक ठरला. गेल्या वर्षी या महिन्यात सुरुवातीपासून उकाडा जाणावत होता. यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून ढगाळ वातावरणामुळे गारवा जाणवत होता. रविवारी (दि. 25) पर्यंत थंडी जाणवत होती. गेल्या पाच-सहा दिवसांपासून तापमानात वाढ होऊन शुक्रवारी पारा 40 अंशांवर पोहचला.


  •