Sat, May 30, 2020 05:09होमपेज › Jalna › स्वाभिमानी संघटना आक्रमक

स्वाभिमानी संघटना आक्रमक

Published On: Aug 27 2018 1:14AM | Last Updated: Aug 27 2018 12:04AMजालना : प्रतिनिधी

शासनाने हमीभावाने शेतीमाल खरेदी करण्याचे आदेश दिल्यानंतर आडत व्यापार्‍यांनी शासनाच्या निषेधार्थ शनिवारी खरेदी केली नाही. दरम्यान व्यापार्‍यांच्या या भूमिकेविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या प्रश्‍नावर तोेेेडगा न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

राज्य शासनाने हमीभावात शेतकर्‍यांचा माल न घेणार्‍या व्यापार्‍यांना एक वर्ष कारावासासह 50 हजारांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात शनिवारी जालना मोंढ्यात व्यापार्‍यांनी खरेदीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे बाहेरगावहून शेतकर्‍यांचा आलेला माल आडत्यांच्या गोदामात विक्रीविना पडून राहिला. खत, बी-बियाणांसह मजुरीचे भाव वाढत असतानाच शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांत असंतोष आहे. या पार्श्‍वभूमीवर शासनाने हमीभावाप्रमाणेच शेतीमाल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयास विरोध करताना आडत व्यापार्‍यांनी सध्या मोंढयात येणारा मूग ओला असून तो हमीभावाने खरेदी करणार कसा? असा प्रश्‍न उपस्थित केला. आंध्र्ा व कर्नाटकात हमीभावाची अट नसल्याने तेथून हमीभावापेक्षा कमी भावात माल महाराष्ट्रात येत असल्याने आमचा माल विकत घेणार कोण? असेही व्यपार्‍यांचे म्हणणे आहे. व्यापार्‍यांनी शनिवारी खरेदी न केल्याने मोंढा बंद होता. त्यामुळे जवळपास 50 ते 60 लाखांवरची उलाढाल होऊ शकली नाही. सोमवारपर्यंत यामध्ये काही निर्णय होणे अपेक्षित आहे. 
या प्रकरणात लवकर तोडगा न निघाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना या विरोधात आक्रमक भूमिका घेणार आहे.