Thu, Jan 17, 2019 17:05होमपेज › Jalna › विद्यार्थी उतरले रस्त्यावर

विद्यार्थी उतरले रस्त्यावर

Published On: Mar 16 2018 1:23AM | Last Updated: Mar 22 2018 1:42AMजालना : प्रतिनिधी

भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाने 1868 कोटी शिष्यवृत्तीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (दि.15) आंदोलन करण्यात आले.

याबाबत जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, मागील दोन वषार्र्ंपासून सर्व विद्याथ्यार्र्ंना शिष्यवृत्ती देण्यात आली नाही. यामुळे राज्यातील जवळपास 50 लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. सामाजिक न्याय विभागाने भ्रष्ट कारभाराची चौकशीच्या अहवालात 1868 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी, एसटी, एस्सी आदी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. या शिष्यवृत्ती भ्रष्टाचारातील गुन्हेगारांना अटक करा, एस्सी प्रवर्गातील उत्पन्न मर्यादा 2 लाखापासून 5 लाखांपयर्र्ंत वाढवावी, ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील उत्पन्न मर्यादा 1 लाखापासून 5 लाखांपर्यत वाढवावी, निर्वाह भत्ता सरसकट दरमहा दीड हजार रुपयांनी वाढ करावी आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदनावर जिल्हा कार्याध्यक्ष संघपाल वाघमारे, अक्षय राठोड, दिनेश खरात, जुबेर खान, दीपक रत्नपारखे, सुनील म्हस्के, रवी दाभाडे, राहुल लोंढे, वैभव वानखेडे, विजय मगरे, युवराज पाईकराव, जयंत काळे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.