Sat, Jan 19, 2019 05:48होमपेज › Jalna › जालना : संभाजी भिडेंच्या कार्यक्रमात घोषणाबाजी

जालना : संभाजी भिडेंच्या कार्यक्रमात घोषणाबाजी

Published On: Jan 06 2019 12:20PM | Last Updated: Jan 06 2019 2:12PM
जालना : पुढारी ऑनलाईन 

शिवप्रतिष्ठान प्रमुख संभाजी भिडे यांच्या जालना येथील कार्यक्रमात संभाजी ब्रिगेड आणि काही दलित संघटनांनी कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी करत अंडे फेक करण्यात आली. यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची माहिती समोर आली. आज, रविवारी सकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी २० पेक्षा अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

जालन्यातील आर्य समाज मंदिरात संभाजी भिडे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. गेल्या आठ दिवसांपासून या बैठकीची माहिती सोशल मीडियावर फिरत होती. या बैठकीला संभाजी ब्रिगेड आणि काही दलित संघटनांचा विरोध होता. सकाळी  बैठक सुरू झाल्याने काही कार्यकर्त्यांनी घटनास्थळी येत भिंडेंविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीमारानंतर ही बैठक सुरू झाली. दरम्यान भिडे यांनी युवकांना गडकोट मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा होता.