Sat, Sep 22, 2018 20:40होमपेज › Jalna › जालना : समता परिषदेच्या ज्येष्‍ठ नेत्याचा अपघाती मृत्यू

जालना : समता परिषदेच्या ज्येष्‍ठ नेत्याचा अपघाती मृत्यू

Published On: Jul 07 2018 12:11PM | Last Updated: Jul 09 2018 1:02AMजालना : पुढारी ऑनलाईन

समता परिषदेचे ज्येष्‍ठ नेते रामभाऊ गाडेकर यांचे अपघाती निधन झाले. शुक्रवारी रात्री ९ वा. च्या सुमारास गाडेकर औरंगाबादहून जालन्याकडे येत असता त्यांच्या इनोव्‍हा कारला अपघात झाला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

येथील नागेवाडी बसस्‍टँडसमोर गाडेकर यांच्या गाडीला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यावेळी गाडेकर स्‍वत: गाडी चालवत होते. या अपघातात गाडी डिव्‍हायडरवर जाऊन पलटी झाली. त्यात गाडेकर यांचा मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेले एकजण जखमी आहे.