होमपेज › Jalna › वाळूमाफियांकडून नायब तहसीलदारांना मारहाण

वाळूमाफियांकडून नायब तहसीलदारांना मारहाण

Published On: Jul 09 2018 1:02AM | Last Updated: Jul 09 2018 1:02AMवडीगोद्री : प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील वाळकेश्वर येथील गोदावरी नदी पात्रात अवैधवाळू तस्करांविरुध्द कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला शहागड येथील 37 वाळूमाफियांनी शिवीगाळ करत नायब तहसीलदारांना मारहाण केली. 37 जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा व जिवे मारण्याची धमकीप्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात दि 7 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 वाळकेश्वर येथे जेसीबी यंत्राच्या सहाय्याने दिवस-रात्र अवैधवाळू उपसा सुरू असून वाहने भरून देण्यात येत असल्याची माहिती नायब तहसीलदार अमित पुरी यांना मिळाली होती. 

वाळूमाफियांची दादागिरी वाढली 

गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यास गेलेल्या तलाठी मंडळ अधिकारी आता नायब तहसीलदार यांच्यावर वाळूमाफियांची दादागिरी वाढली आहे. मारहाण, शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार वाढल आहेत. शहागड, गोंदी परिसरात गुन्हेगारी वाढत असल्याचे हे चित्र आहे.

अवघ्या दोन वाळूपट्ट्यांचे लिलाव..! 

जिल्ह्यातील 22 वाळू पट्ट्यांपैकी केवळ दोनच पट्ट्यांचे लिलाव झाले. इतर ठिकाणच्या पट्ट्यांच्या लिलावास प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. 
वाळू उपशासह गौण खनि उत्खनन असो किंवा अन्य गोष्टी करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार गौण खनिज आराखड्यानुसारच पुढील कार्यवाही करण्याचे आदेश असल्याने यावर्षी वाळू घाटांच्या लिलावास उशीर झाला. प्रशासनाने जिल्ह्यातील 22 वाळूपट्ट्यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली. पहिल्या तीन फेरीत लिलावास काही प्रतिसाद मिळाला नाही, चौथी फेरीही वाया जाण्याची शक्यता असताना 22 पैकी 2 वाळू घाटांचे लिलाव झाले आणि त्यातून अंदाजे सात लाखांचा महसूल मिळाला, परंतु 20 लिलाव न झाल्याने नुकसान मात्र, अंदाजे 5 कोटी रुपयांचे झाले. पावसाळ्यापूर्वीच जिल्ह्यातील 52 वाळू पट्ट्यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली होती.