Sun, Nov 18, 2018 01:38होमपेज › Jalna › व्यापाऱ्याचे भर दिवासा पाच लाख लुटले, पोलिसांची शहरात नाकाबंदी  

व्यापाऱ्याचे भर दिवासा पाच लाख लुटले, पोलिसांची शहरात नाकाबंदी 

Published On: Jul 06 2018 4:19PM | Last Updated: Jul 09 2018 1:02AMजालना : प्रतिनिधी

नवीन जालन्यातील जेठमलनगर परिसरात व्यापाऱ्याला भरदिवसा लोटण्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे भागात एषच खळबळ उडाली. घटानास्थाळी पोलसांनी धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती घेऊन शहरात नाकाबंदी केली आहे.

जेठमलनगर परिसरात किराणा व्यापाऱ्याला ५ लाख १२ हजाराला लुटले. शुक्रवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. अनिल अग्रवाल असे व्यापाऱ्याचे नाव असून त्यांचे किराणा दुकान आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून शहराची नाकाबंदी केली आहे.