Sat, Jul 20, 2019 08:41होमपेज › Jalna › संगम बीअर बारवर धाड

संगम बीअर बारवर धाड

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 1:21AMआखाडा बाळापूर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दारू विक्री बंद असतानाही येथील शेवाळा रोडवर बंदी आदेशांना हरताळ फासून अवैध विदेशी दारू विक्री होत असलेल्या संगम बीअर बारवर आखाडा बाळापूर पोलिसांनी सोमवारी रात्री 9 च्या सुमारास धाड टाकून तब्बल 70 हजाराची दारू व रोख रक्कम जप्त केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने शासनाकडून दारू विक्री बंदचा आदेश देण्यात आला होता. हा आदेश असतानाही ओमप्रकाश नारायण ठमके यांच्या शेवाळा रस्त्यावरील संगम बीअर बारवर अवैध विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांना मिळताच त्यांनी सोमवारी रात्री 9 च्या सुमारास नायब तहसीलदार तेलंग, गणेश दळवी, सुभाष घुगे, शेख बाबर, शेख अर्सद यांना सोबत घेऊन बारवर धाड टाकली असता, अवैध दारू विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी विदेशी दारूचे बॉक्स 66 हजार 816 रुपये किमतीचे व नगदी 2 हजार 460 असा एकूण 70 हजारांचा ऐवज ताब्यात घेतला. 

या प्रकरणी ओमप्रकाश नारायण ठमके, रा. आखाडा बाळापूर, दत्ता पुुंडलिक मोरे, रा. वारंगा, संतोष तुकाराम येरेवार, रा. भोईगल्ली आखाडा बाळापूर यांच्याविरुद्ध आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बाळापूर पोलिस करीत आहे. शिवजयंतीनिमित्त सर्वत्र कार्यक्रम सुरू असताना संगमच्या बारमालकाने अवैध दारू विक्री सुरूच ठेवल्याने बाळापूर पोलिसांनी धाड टाकल्याने खळबळ उडाली आहे.