Tue, Nov 13, 2018 22:12होमपेज › Jalna › युती व आघाडीच्या पक्षांना जनता नाकारत आहे

युती व आघाडीच्या पक्षांना जनता नाकारत आहे

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 05 2018 12:09AMजालना ः प्रतिनिधी

केंद्रात व राज्यात सत्ता परिवर्तन होऊन नागरिकांचे प्रश्‍न सुटलेले नाहीत. प्रश्‍न सुटण्याऐवजी प्रत्येक क्षेत्रांतील नागरिक कोणत्या कोणत्या कारणाने नाराज होत आहेत. युती व आघाडीच्या पक्षांना जनता नाकारत असल्याने राष्ट्रविकासासाठी संभाजी ब्रिगेड हा राजकीय पर्याय असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी केले.

  येथील मराठा महासंघाच्या कार्यालयात संभाजी ब्रिगेडचा संवाद कार्यकर्ता मेळावा रविवारी (दि.3) सायंकाळी घेण्यात आला. यावेळी खेडेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे होते. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख, प्रा.शिवानंद भानुसे, सुदर्शन तारख, जिल्हाध्यक्ष तुळशीराम चंद, प्रा. संतोष मोरे, विजय वाडेकर, कैलास खांडेभराड, सोमेश घारे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी जगन्नाथ काळे, जालिंदर मोरे,  विनोद जाधव,  धनजंय चावरे   राजेभाऊ जगताप,  दिलीप जाधव, अण्णासाहेब उगले, रामप्रसाद वाघ, नारायण चंद, केशव घारे, संभाजी गायके, बाळासाहेब बरसाले, भगवान भुतेकर, शिवाजी भागीले, आकाश थिटे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. नरेश म्हात्रे तर आभार जालिंदर मोरे यांनी मानले.