Sat, Mar 23, 2019 16:43होमपेज › Jalna › वाहनचालकांची कसरत 

वाहनचालकांची कसरत 

Published On: Jul 17 2018 1:34AM | Last Updated: Jul 17 2018 12:35AMजालना : प्रतिनिधी

सोमवारी सुरू झालेला पाऊस दिवसभर कोसळला. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडाली. चिखलमय रस्त्यांमुळे पायी चालणेही मुश्कील झाले होते. दुचाकी आणि वाहनचालकांना खड्ड्यांतून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारक करीत आहेत. 

गतवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यांचे काम करण्यात आलेले नाही. या रस्त्यावर मात्र खड्डे दिसत नसले तरी कामाची गुणवत्ता न राखल्याने रस्त्यावरच पाणी साचत आहे. अनेक ठिकाणचे रस्त्यालगतचे सिमेंट गट्टू निघाले आहे. काही रस्त्यांचे काम व्यवस्थित न झाल्याने बर्‍याच ठिकाणी रस्ता खालीवर झालेला आहे.ज्या ठिकाणी रस्त्याचे काम झालेले नाही, अशा ठिकाणच्या रस्त्यावर खड्डे पडले आहे. लालबाग ते कन्हैय्यानगर, गोल्ड ज्युबली परिसरातील रस्त्यावर आदी रस्त्यावर खड्डे  दिसून येते.

रस्त्यावरील खड्ड्यांची मलमपट्टी दर चार-पाच महिन्यांच्या अंतराने सार्वजनिक बांधकाम विभाग कायमचे ऑपरेशन न करता रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची थातूरमातूर मलमपट्टी करून मोकळे होते. यामुळे रस्त्यावर खड्डे दिसतात. रस्त्यावरील खड्ड्यांची मलमपट्टी केलेले हेच खड्डे परत पूर्वीपेक्षा धोकादायक होताना दिसतात.